शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राहुल शर्माच्या शतकी तडाख्याने औरंगाबाद विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:26 IST

मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज राहुल शर्मा याचे सलग दुसरे शतक, कर्णधार स्वप्नील चव्हाण, विश्वजित राजपूत आणि प्रज्वल घोडके यांच्या शानदार अर्धशतकानंतर शुभम चाटे, प्रवीण क्षीरसागर, नितीन फुलाने यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने मंगळवारी परभणीवर एक डाव आणि ३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राहुल शर्मा याच्या शतकी तडाख्याच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डाव ८ बाद ३५६ धावांवर घोषित केला. बलाढ्य पुण्याच्या डेक्कनविरुद्ध १0१ धावांची खेळी करणाऱ्या राहुल शर्माने परभणीविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवत १२७ चेंडूंत १७ खणखणीत चौकार व २ टोलेजंग षटकारांसह नाबाद १२२ धावांची खेळी केली.

ठळक मुद्देपरभणीवर डावाने मात : स्वप्नील, विश्वजित, शुभम, प्रज्वल चमकले

औरंगाबाद : मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज राहुल शर्मा याचे सलग दुसरे शतक, कर्णधार स्वप्नील चव्हाण, विश्वजित राजपूत आणि प्रज्वल घोडके यांच्या शानदार अर्धशतकानंतर शुभम चाटे, प्रवीण क्षीरसागर, नितीन फुलाने यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने मंगळवारी परभणीवर एक डाव आणि ३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.राहुल शर्मा याच्या शतकी तडाख्याच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डाव ८ बाद ३५६ धावांवर घोषित केला. बलाढ्य पुण्याच्या डेक्कनविरुद्ध १0१ धावांची खेळी करणाऱ्या राहुल शर्माने परभणीविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवत १२७ चेंडूंत १७ खणखणीत चौकार व २ टोलेजंग षटकारांसह नाबाद १२२ धावांची खेळी केली. कर्णधार स्वप्नील चव्हाणने ६५ चेंडूंतच ८ चौकार व एका षटकारासह ५३, विश्वजित राजपूतने ८0 चेंडूंत ६ चौकार व एका चौकारासह ६0 आणि प्रज्वल घोडकेने ९८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा केल्या. परभणीकडून जयदीप भराडेने ६५ धावांत ३ गडी बाद केले. पुरुषोत्तम खांडेभराड, यश चांदेकर व सूरज गांगुर्डे यांनी प्रत्येकी १ गड बाद केला.औरंगाबादचे सलामीवीर २४ धावांत परतल्यानंतर कर्णधार स्वप्नील चव्हाण आणि विश्वजित राजपूत यांनी तिसºया गड्यासाठी १0९ धावांची भागीदारी करीत औरंगाबादच्या विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला. त्यानंतर राहुल शर्माने प्रज्वल घोडके याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी १४९ धावांची भागीदारी करीत औरंगाबादला निर्णायक धावसंख्या उभारून दिली.त्यानंतर औरंगाबादने परभणीचा पहिला डाव २३१ धावांत रोखला. परभणीकडून योगेश यादवने १0७, संदीप चव्हाणने ४७ धावांची झुंजार खेळी केली. औरंगाबादकडून प्रवीण क्षीरसागर व नितीन फुलाने यांनी प्रत्येकी ३, तर शुभम चाटेने २ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाण व हरमितसिंग रागीने प्रत्येकी १ गडी बाद केला. त्यानंतर औरंगाबादने परभणीवर फॉलोआॅन लादत त्यांचा दुसरा डाव अवघ्या ९0 धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळवला. परभणीकडून दुसºया डावात कर्णधार यश चांदेकरने सर्वाधिक ३४ धावा केल्या. औरंगाबादकडून शुभम चाटेने १७ धावांत ४ गडी बाद केले. त्याला प्रवीण क्षीरसागरने १६ धावांत २ व राहुल शर्माने १५ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. नितीन फुलाने याने १ गडी बाद केला.