शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

शहरबस सेवेमध्ये लवकरच होणार अमुलाग्र बदल : मनपा आयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:06 IST

शहर बस होणार आणखी 'स्मार्ट' 

ठळक मुद्देशहर बसची संख्या होणार ९०

औरंगाबाद : महापालिकेच्या शहर बस सेवेत आणखी सुसूत्रता आणण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच शहर बसची संख्या 90 पर्यंत जाणार आहे. बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात येणार आहे. जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळवण्यात येईल अशी माहिती महानगरपलिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिली. 

यासोबतच सध्या वापरण्यात येत असलेले तिकीट मशीन संदर्भात तक्रारी येत आहेत. अत्याधुनिक मशीन खरेदी करण्याचा संकल्पही आज मनपा आयुक्त डॉक्टर निपून विनायक यांनी व्यक्त केला. बसचे वेळापत्रक पाळण्यात येत नसल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी नमूद केले की लवकरच अमुलाग्र बदल दिसून येतील.

शहर बसचे नाही नियोजन केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने २३ जानेवारीपासून शहरात ‘स्मार्ट बस’सेवा सुरू केली. ही सेवाही एस.टी. महामंडळासारखीच सुरू आहे. यामध्ये कुठेच ‘स्मार्ट’पण पाहायला मिळत नाही. २२ मार्गांवर ४९ बस सध्या धावत आहेत. त्यातील बहुतांश फेऱ्या रिकाम्याच असतात. प्रवाशांना कोणत्या स्टॉपवर बस किती वाजता येईल, हेच माहीत नाही. त्यामुळे बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी अधिक पैसे देऊन रिक्षाने प्रवास करणे पसंत करीत आहेत.

५० टक्के फेऱ्या रिकाम्या धावतात महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत तब्बल १०० बस खरेदी केल्या आहेत. बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळावर सोपविली आहे. मागील सात महिन्यांमध्ये या बससेवेचा २१ लाख ८३ हजार प्रवाशांनी फायदा घेतल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. १३ लाख ५३ हजार ३५२ किलोमीटर अंतर बसने पूर्ण केले. २२ मार्गांवर ४९ बस धावत आहेत. बहुतांश बस ५५ ते ६१ टक्के रिकाम्याच धावतात. कारण महापालिकेने कुठेच बसस्टॉप तयार केले नाहीत. 

सात महिन्यांत अडीच कोटी जमा२३ जानेवारी ते १६ आॅगस्टपर्यंत तिकिटातून २ कोटी ५६ लाख ८५ हजार ३०६ रुपये तिजोरीत जमा झाले. यात सर्वाधिक ४९ लाख रुपये जुलै महिन्यात मिळाले असून, आॅगस्ट महिन्याचा आकडा ६० लाखांच्या घरात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित बस सुरू करण्यासाठी १८६ चालक-वाहकांची आवश्यकता असून, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादtourismपर्यटन