शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैठण 'MIDC'त अंबानींच्या सुनेची एन्ट्री; ३ महिन्यांत दुसऱ्यांदा राधिका मर्चंट यांच्याकडून पाहणी, विस्ताराला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:58 IST

कडक पोलीस बंदोबस्त अन् गाड्यांचा ताफा! राधिका मर्चंट यांचे पैठण एमआयडीसीत आगमन; एमआयडीसीच्या विस्ताराला मिळणार बळ

- समीर पठाणजायकवाडी (पैठण): पैठण एमआयडीसीमधील औषधी क्षेत्रातील अग्रगण्य 'इनकोर हेल्थ केअर' कंपनीला गुरुवारी (दि. २६) कंपनीच्या संचालिका राधिका मर्चंट-अंबानी यांनी भेट दिली. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने राधिका मर्चंट यांनी दुसऱ्यांदा पैठणला भेट दिल्याने स्थानिक औद्योगिक वर्तुळात मोठ्या विस्ताराच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेलिकॉप्टरने आगमन अन् कडक सुरक्षागुरुवारी सकाळी १०:३० वाजता राधिका मर्चंट आणि त्यांचे वडील विरेन मर्चंट यांचे हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले. राधिका मर्चंट येणार असल्याची माहिती मिळताच हेलिपॅड परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केल्याने वाहनांचा ताफा थेट एमआयडीसीतील कंपनीच्या प्रकल्पस्थळी रवाना झाला.

काय होता भेटीचा उद्देश?यापूर्वी १ व २ डिसेंबर २०२५ रोजी राधिका मर्चंट पैठण दौऱ्यावर आल्या होत्या. या एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी कंपनीच्या विविध प्रकल्पांची प्रगती, उत्पादनाची गुणवत्ता आणि भविष्यातील विस्तार योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक विकासाला चालनाअंबानी आणि मर्चंट कुटुंबाच्या या भेटीमुळे पैठण औद्योगिक वसाहतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या भेटीमुळे कंपनीच्या विस्ताराला गती मिळेल, ज्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambani's daughter-in-law visits Paithan company, fueling expansion hopes.

Web Summary : Radhika Merchant-Ambani visited Incor Health Care in Paithan for the second time in three months, sparking speculation about a major expansion. Her visit included reviewing project progress and future plans, potentially boosting local employment opportunities and giving the industrial area international recognition.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMIDCएमआयडीसी