शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजच्या महावितरण कार्यालयात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:31 IST

वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे तसेच विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात बुधवारी (दि.२२) दुपारी २ वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. या वादावादीनंतर एकाने सहायक अभियंत्यास मारहाण करून कागदपत्रे फाडली.

ठळक मुद्दे खंडित वीजपुरवठ्यामुळे सहायक अभियंत्यास मारहाण

वाळूज महानगर : वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे तसेच विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात बुधवारी (दि.२२) दुपारी २ वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. या वादावादीनंतर एकाने सहायक अभियंत्यास मारहाण करून कागदपत्रे फाडली.वाळूज गावातील मच्छी मार्केट व लांझी टी पॉइंटजवळील विद्युत ट्रान्सफार्मर सतत नादुरुस्त होत असल्यामुळे वीजपुरवठा कायम खंडित होत आहे. तेथे उच्च क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अशातच मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील सीएट फिडरवरील केबर वायर जळाल्यामुळे वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, कमळापूर, नारायणपूर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने दुरुस्ती केल्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाळूजच्या मच्छीमार्केटमधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे या ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्याची मागणी करीत नागरिकांचे शिष्टमंडळ वाळूजच्या महावितरण कार्यालयात गेले होते. यावेळी सहायक अभियंता प्रमोद महाजन, उपकार्यकारी अधिकारी दत्तात्रय पुंडे, अनंत बरसावणे, बाळासाहेब पहाडे हे चर्चा करीत असताना अफरोज ऊर्फ भय्या पठाण (रा.वाळूज) कार्यालयात आला. अफरोजने सहायक अभियंता महाजन यांना तू आमच्या डीपीचे काम का करीत नाही, असा वाद घालत त्यांची कॉलर पकडून मारहाण केली. महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. काही कागदपत्रे फाडून टाकली. या प्रकरणी महाजन यांच्या तक्रारीवरून अफरोज ऊर्फ भय्या पठाण याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण