शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पावसाचा फटका, यंदा रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2023 20:03 IST

कृषी विभागाचा अंदाज : अत्यल्प पावसाचा रब्बी हंगामालाही फटका

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५६ टक्केच पाऊस पडल्याचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसला. चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. असे असले तरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. शिवाय रब्बी हंगामातील प्रमुख गहू पिकाचे क्षेत्र घटून ज्वारी, करडईचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला. मुसळधार पाऊस न झाल्यामुळे नदी, नाले काेरडे आहेत. परिणामी, भूजलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यांत यावर्षी सुमारे ९ लाख २८ हजार ७२८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. अपुऱ्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ टक्के गव्हाचे क्षेत्र घटून रब्बी ज्वारीचे क्षेत्र २८ टक्के वाढणार आहे. जालना जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र सरासरी ३६ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र केवळ १४ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तर बीड जिल्ह्यातही शेतकरी गव्हाऐवजी रब्बी ज्वारी आणि हरभरा सूर्यफूल, करडई या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणारअत्यल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. असे असले तरी चार दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि पुढील काही दिवस पावसाचे दिवस असल्याने खरीप पिकाला लाभ होईल. खरिपातील उडीद, मुगाच्या क्षेत्रावर आता रब्बी पिकांची पेरणी काही दिवसांत सुरू होईल. यंदा मात्र रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार आहे.-आर. टी. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र