शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सोशल मीडियातून अफवा अन् छत्रपती संभाजीनगरात पुन्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 4:22 PM

अफवेमुळे पंपावर वाहनधारकांची गर्दी होत असून इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची परिस्थिति

छत्रपती संभाजीनगर: 'हीट अँड रन' कायद्याच्या विरोधात  टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याच्या अफवेने शहरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, पेट्रोलियम डिलर संघटनेचे शहराध्यक्ष अखिल अब्बास यांनी स्पष्टीकरण दिले असून पेट्रोल- डिझेलचे टँकर चालक संपावर जाणार याबाबत कोणतीही माहिती चालकांच्या संघटनेने दिलेली नाही. यामुळे पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.  

सोशल मिडियातून पसरली अफवाट्रक चालक संपावर जाणार असल्याने पेट्रोल पंप बंद असतील अशा आशयाची अफवा सोशल मिडियातून शहरात पसरली. यामुळे काही वेळातच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली. चार दिवस पेट्रोल पंप बंद राहतील, असे सोशल मिडियातून कळल्याचे काही वाहनधारक पंपावर सांगत होते. 

.. तर कृत्रिम टंचाई निर्माण होईल पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक संपावर जाणार याबाबत त्यांच्या संघटनांनी काहीच जाहीर केलेले नाही. यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवेमुळे पंपावर गर्दी होत आहे. यामुळे इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. कोणीही अफवेस बळी पडू नये. - अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डिलर संघटना  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAurangabadऔरंगाबाद