शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘गुणवत्ता कोणा एकाची मक्तेदारी ठरत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:59 IST

बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : गुणवंतांचा कौतुक सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शहरातील माजलगावकर मठ येथे जय संताजी प्रतिष्ठानच्या वतीने तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. व्यासपीठावर मन्मथ हेरकर, दिलीप गोरे, बबनराव गोरे, अ‍ॅड.शेख शफिक, शाहेद पटेल, दिनेश परदेशी, दत्तात्रय सोनटक्के, राजाराम बन्सोडे व प्रतिष्ठानचे शिवलिंंग क्षीरसागर आदी उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या वतीने तसेच माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर, पाटोदा, परळी व अंबाजोगाई येथील तेली समाजबांधवांनी आ. जयदत्त क्षीरसागर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते १७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.संत जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली असून, स्थानिक निधीतून १० लाख रूपये देऊन लवकरच सभामंडपाचे कामही सुरू होईल, असे आ. क्षीरसागर यावेळी म्हणाले.प्रास्ताविक शिवलिंंग क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले.जनगणना : गरजेची४ यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आरक्षण हे जातनिहाय असले तरी नव्याने जनगणना करून ओबीसीच्या आरक्षणात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जनगणना होणे ही काळाची गरज बनली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र