शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल झालाय; आता न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:13 IST

औरंगाबाद खंडपीठाचा ३९ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला

ठळक मुद्देखंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी केले मार्गदर्शन

औरंगाबाद :  दाखल आणि निकाली प्रकरणांची संख्या पाहता मराठवाड्यातील पक्षकारांना त्यांच्या दारात न्याय मिळत असल्याचे सिद्ध होते. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला असला तरी न्यायापासून वंचित असलेल्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तरुण वकिलांवर आहे, अशी भावना खंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी व्यक्त केली.  खंडपीठाच्या ३९ व्या वर्धापन दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या शुभेच्छा त्यांनी वाचून दाखविल्या. मुख्य न्यायमूर्ती सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात खंडपीठाला भेट देतील, असे त्यांनी सांगितले.खंडपीठ वकील संघाच्या सदस्यांमधून न्यायमूर्ती नरेश पाटील हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे वकिलांमधून अनेकांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली तर अनेकांना ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून खंडपीठाने नियुक्त केले. ज्युनिअर वकील ही परंपरा चालू ठेवतील, अशी आशा न्या. गंगापूरवाला यांनी व्यक्त केली.

खंडपीठ वकील संघाचे सचिव अ‍ॅड. शहाजी घाटोळ पाटील यांनी खंडपीठाच्या स्थापनेचा इतिहास सांगत वकिलांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. लॉकडाऊन काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे सुनावणी होत असल्यामुळे वकिलांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. अ‍ॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अश्फाक पटेल यांनी आभार मानले.

खंडपीठात प्रलंबित प्रकरणे :- मूळ दिवाणी प्रकरणे ८३४०२ किरकोळ दिवाणी प्रकरणे ५६८७३ अशी एकूण  दिवाणी प्रकरणे १४०२७५

- मूळ फौजदारी प्रकरणे १७२४३किरकोळ फौजदारी प्रकरणे २९९८एकूण फौजदारी प्रकरणे २०२४१ 

- खंडपीठासाठी न्यायमूर्तींची मंजूर पदे  २२सध्या कार्यरत न्यायमूर्ती १२ 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय