शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सहा रुपयांच्या गुणपत्रिकेची खरेदी अडीच रुपयांनी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या खरेदीच्या सुरस कथा चर्चिल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेच्या कागद खरेदीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यापीठ : मागील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घोटाळा; अधिकृत समित्या आल्यामुळे झाला भांडाफोड

राम शिनगारेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या खरेदीच्या सुरस कथा चर्चिल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेच्या कागद खरेदीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. या निविदेतील दर आणि यापूर्वी शेषा शाईन कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या दरात ३ रुपये ४५ पैशांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले.विद्यापीठातील परीक्षा विभागात गोपनीयतेच्या नावाखाली मनमानी पद्धतीने खरेदी करण्यात येत होती. याविषयी राज्यपालांकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. यावर माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली होती. या समितीने उच्चशिक्षण विभाग आणि राज्यपाल कार्यालयाकडे अहवाल सादर केल्यानंतरही त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. डॉ. जयश्री सूर्यवंशी प्रभारी परीक्षा संचालक असतानाही त्यांनी अतिरिक्त उत्तरपत्रिका खरेदी करण्याची गरज नसल्याचा अहवाल दिल्यामुळे त्यांच्याकडून पदभार काढण्यात आला होता. याच कालावधीत विद्यापीठाच्या गुणपत्रिकांचा कागद संपला होता. तो खरेदी करण्यासाठी गोपनीयतेच्या नावाखाली मर्जीतील कंपन्यांना आॅर्डर देण्याची तयारी सुरू होती. मात्र, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेंद्र मडके यांनी खुल्या निविदांच्या आधारेच खरेदी केली जाईल, असे स्पष्ट केले. यानंतर गुणपत्रिकांचा कागद पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात राज्यातून पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. मागील वर्षी खरेदी करण्यात आलेल्या शेषा शाईन या कंपनीने निविदा स्पर्धेत सहभाग घेतला नाही. या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील अटलांटा कंपनीची निविदा सर्वात कमी असल्यामुळे त्यांना गुणपत्रिकेचा कागद पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीचा दर प्रति गुणपत्रिका २ रुपये ५८ पैसे असणार आहे. या दराने तब्बल ७ लाख गुणपत्रिकांचा कागद खरेदी केला जाणार आहे. शेषा शाईन कंपनीने मागील वर्षी गुणपत्रिकेचा कागद पुरविला होता. त्याचा दर हा ६ रुपये ३ पैसे एवढा होता. यावर्षीच्या दरापेक्षा तब्बल ३ रुपये ४५ पैसे एवढा अधिकचा दर विद्यापीठ प्रशासनाने शेषा शाईन कंपनीला मंजूर केला आहे. या दरावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.(चौकट)२५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा फरकविद्यापीठाच्या गुणपत्रिकांच्या मागील वर्षी आणि यावर्षीच्या कागद खरेदीमध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरात दोन्ही सत्रांसाठी ७ लाख गुणपत्रिका वितरित होतात. मागील वर्षीचा दर ६ रुपये ३ पैसे होता. यावर्षीचा हाच दर २ रुपये ५८ पैशांवर आला आहे. यात विद्यापीठाचे २५ लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.परीक्षेची कंत्राटे दोन-तीन कंपन्यांनाचविद्यापीठातील परीक्षा विभागाची विविध कंत्राटे वुई शाईन, शेषा शाईन या कंपन्यांनाच वारंवार देण्यात येत आहेत. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली सीईटी, पेट परीक्षा, महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठविणे, उत्तरपत्रिकांची छपाई, पदव्यांची छपाई, गुणपत्रिकांचा कागद आदींची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे या दोन कंपन्यांनाच देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठEducationशिक्षण