शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्याला आली जाग; अजिंठा लेणी रस्त्यासाठी ३१ जुलै डेडलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:23 IST

लोकमत इम्पॅक्ट: जागतिक वारसास्थळाच्या दर्जा लाभलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटक रोडावले असून, जागतिक पातळीवर महाराष्ट्राची नामुष्की होत आहे.

- विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले असून, ३१ जुलैपर्यंत काम पू्र्ण करण्याची डेडलाइन ठरविली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये अजिंठा रोडबाबत चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता एस. एल. गलांडे यांनी याविषयी माहिती दिली.

जागतिक वारसास्थळाच्या दर्जा लाभलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटक रोडावले असून, जागतिक पातळीवर महाराष्ट्राची नामुष्की होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेण्यांपर्यंतच्या सुमारे ९५ किमी अंतराच्या रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपासून काम सुरू आहे. अजून २० किमीचे काम अर्धवट आहे. काही कामाची दोनवेळा डागडुजी करावी लागली. २०२० साली या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १ हजार कोटीची निविदा काढण्यात आली. सिमेंट काँक्रिटीकरणातून रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, सिल्लोड शहरातील ६.२ किमी, निल्लोड ७ किमी, हर्सूल १ किमी, पालोद, अजिंठा पुलाचे काम बाकी आहे. यातील निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे काम धुळे सा. बां.कडे आहे. ७ किमीचे ते काम बाकी आहे.

शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे काय करणारअजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सूल ते फर्दापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफच्या चौपदरीकरणादरम्यान असलेल्या हर्सूल गावातील मालमत्तांची पाडापाडी करून रस्ता मोकळा केला. परंतु रस्त्यालगत असलेल्या कब्रस्तानाच्या स्थलांतराचा प्रश्न कायम आहे. रस्त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे जागा मागितली होती. परंतु त्यांनी जागा दिली नाही. मग कब्रस्तानच्या जागेचा पर्याय समोर आला. जागा मिळेपर्यंत सध्या १० मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबणार नाही. १० दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे गलांडे म्हणाले.

पाच वर्षांत ७० किमी काम...रोज ३ किमी काँक्रीट रस्ते बांधण्याचा दावा करणारी यंत्रणा मागील ५ वर्षांपासून ९५ किमीपैकी ७० किमी रस्ता बांधू शकली आहे. कंत्राटदाराची क्षमता १२० टीपीएच, ३० हजार क्युबिक मीटर दरमहा काँक्रिटीकरणाची असतानादेखील कामाला विलंब झाला. या क्षमतेच्या कंत्राटदाराकडून दरमहा १३ किमी रस्ता बांधणी अपेक्षित असते. लांबी, रुंदी, जागा, वाहतूक याचा विचार होऊन रस्त्याचे काम होते. या क्षमतेचा विचार केला तर साधारणत: तीन महिन्यांत रस्ता व आठ महिन्यांत पुलांचे काम होणे शक्य आहे. वर्षभरात रस्ता पूर्ण होण्याऐवजी पाच वर्षे लागले आहेत.

३१ जुलैपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करूजुलै २०२५ पर्यंत शिल्लक राहिलेले काम पूर्ण करू. त्यासाठी कामाचे टप्पे ठरविले आहेत. भूसंपादनाबाबतही एसडीएमकडे पत्रव्यवहार करून रक्कम जमा केली आहे.- एस. एल. गलांडे, कार्यकारी अभियंता, सा. बां.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळroad safetyरस्ते सुरक्षा