शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक प्रवासी वाहनांना जीपीएस, पॅनिक बटणचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:42 IST

रिक्षा आणि ई-रिक्षा वगळता एक एप्रिलपासून उत्पादित सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ (जीपीएस यंत्रणा) आणि ‘पॅनिक बटण’ बसविणे बंधनकारक करण्यात आले. परिवहन विभागाने त्याबाबतचा आदेश काढला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

औरंगाबाद : रिक्षा आणि ई-रिक्षा वगळता एक एप्रिलपासून उत्पादित सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही उपकरणे नसलेल्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यापासून रोखण्यात आले; परंतु केंद्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत एप्रिलपूर्वी उत्पादित, विक्री आणि नोंदणी झालेल्या वाहनांना सक्ती करण्यात येऊ नये, अशी सूचना गुरुवारी अपर परिवहन आयुक्तांनी केली

अपर परिवहन आयुक्तांनी केलेल्या सुचनेने अनेक वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.  ई-रिक्षा, आॅटो रिक्षा वगळता सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ (जीपीएस यंत्रणा) आणि ‘पॅनिक बटण’ बसविणे बंधनकारक करण्यात आले. परिवहन विभागाने त्याबाबतचा आदेश काढला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा बसमधील सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून त्यांच्यासोबत गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी पॅनिक बटण वापरता येणार आहे.

चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव चालवीत असेल, तर अशा वेळेसदेखील मदतीची मागणी करण्यासाठी याचा उपयोग शक्य आहे. ‘लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ (जीपीएस यंत्रणा) आणि ‘पॅनिक बटण’ नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून आरटीओ कार्यालयाने फिटनेस प्रमाणपत्र देणे थांबविले होते. ही दोन्ही उपकरणे उपलब्ध होत नसल्याची ओरड वाहनधारकांकडून करण्यात आली. अखेर एप्रिल महिन्यापूर्वीच्या वाहनांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत त्यांना सक्ती करण्यात येणार नाही; एप्रिलपासून उत्पादित वाहनांना ही उपकरणे असल्याची खात्री करून नोंदणी केली जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसfour wheelerफोर व्हीलरAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी