शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक खाजगी भागीदारीतील ‘समांतर’ योजना गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 16:01 IST

मनपा आयुक्तांनी समांतरच्या कराराचे पुनरुज्जीवन करणे अशक्य असल्याचे मत नोंदविले.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेची मंजुरीनवीन योजनेसाठी शासनाकडे पाठविणार प्रस्ताव

औरंगाबाद : महानगरपालिकेने समांतरच्या कंपनीसोबत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहे. समांतरच्या कंपनीनेदेखील अटी मान्य होणार नसतील, तर आम्ही काम करणार नाही, असे लेखी कळविले. त्यानंतर मनपाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजनेला गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आता शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 

महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याविषयी प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला सभागृहाने सुधारणांसह मंजुरी दिली. जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत वाढीव पाणी आणण्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून त्याची मंजुरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत नवीन जलवाहिनीच्या योजनेसाठी आयुक्तांनी योग्य तो निर्णय घ्यावा, त्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावे, असे नगरसेवकांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांपासून ‘समांतर योजना’ शहरात राहणार की जाणार, अशी चर्चा चालू होती. दहा वर्षांपूर्वी शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर समांतर जलवाहिनी योजना आखली होती. या योजनेचे कंत्राट एसपीएमएल कंपनीला देण्यात आले होते; परंतु या कंपनीने दोन वर्षांत अपेक्षित गतीने काम न केल्यामुळे आॅक्टोबर २०१६ मध्ये मनपाने एसपीएमएल कंपनीसोबतचा करार रद्द केला. पुढे ही कंपनी न्यायालयात गेली. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.

मनपाने न्यायालयाबाहेर तडजोड करून पुन्हा एसपीएमएलकडूनच हे काम करून घेण्याचे ठरविले. त्यासाठी ४ आॅक्टोबर २०१८ मध्ये कराराच्या पुनरुज्जीवनाचा ठराव मंजूर करण्यात आला; परंतु कंपनीने नंतर काही अटी टाकल्या. त्यात कंपनी मुख्य लीड मेंबर एसपीएमएलऐवजी एस्सेल ग्रुप कंपनी असावी, या अटीचा समावेश होता. महापालिकेने सरकारी अभियोक्त्यांकडून याबाबत मार्गदर्शन मागविले. त्यांनी कायद्याने हे शक्य नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर कंपनीनेही आमच्या अटी मान्य नसतील, तर आम्हीही काम करण्यास असमर्थ आहोत, असे लेखी कळविले.

काय होती समांतर जलवाहिनीची योजना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पीपीपी मॉडेलअंतर्गत ही योजना तयार केली गेली. योजना पूर्ण होण्यापूर्वीच मॉडेलला जागतिक पुरस्कार मिळाला. हेच काय ते योजनेचे भाग्य. पाणी तर मिळालेच नाही. उलट आता शासनाकडे नव्याने योजना बांधण्याचा पर्याय समोर आला आहे. 

१२८९ कि़मी.च्या अंतर्गत जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती करणे, जायकवाडी ते फारोळा या २७ कि़मी.च्या अंतरात २ हजार मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे. ११ जलकुंभ बांधणे, घरगुती व व्यावसायिक नळांचे मीटर बदलणे. १९३ कोटी मुख्य जलवाहिनीसाठी, पंपिंग स्टेशनसाठी १८ कोटी, नक्षत्रवाडी ते शहर जलवाहिनीसाठी १०३ कोटी, अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभांसाठी ३२० कोटी व वॉटर मीटरसाठी ५६ कोटी ६३ लाखांचा खर्च योजनेसाठी होता. ३ वर्षांत योजनेचे काम होणे बंधनकारक होते. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी या कंत्राटदार कंपनीचा हिस्सा ३९२ कोटी ६८ लाखांचा होता. मनपा व शासन अनुदान ३९९ कोटी ५३ लाख रुपयांचे होते. दोन्ही बाजूंची रक्कम समान १२ हप्त्यांमध्ये खर्च होईल. ७९२ कोटी रुपयांत योजनेचे काम करावे लागेल. ७९२ कोटी रुपयांच्या त्या योजनेसोबत मनपाने २२ सप्टेंबर २०११ रोजी सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लि. या कंपनीसोबत कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट केले होते. त्यानंतर मे २०१२ मध्ये कंपनीने स्पेशल व्हेईकल पर्पजअंतर्गत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला काम दिले. समांतर जलवाहिनीसाठी केंद्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे १४० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आले आहे.

प्रत्यक्ष पाणी कधी येणार?या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी समांतरच्या कराराचे पुनरुज्जीवन करणे अशक्य असल्याचे मत नोंदविले. आता मनपाकडून शासनाकडे नव्या योजनेसाठी निधी मागविणारा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यास तात्काळ मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष काम होऊन शहरात वाढीव पाणी येण्यासाठी किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी