शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपकरणे पुरवून ‘रुग्णसेवा मंडळा'चा आजारी व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:22 IST

वैद्यकीय खर्च एवढे महागडे असताना त्यात उपकरणांची खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी खूपच अवघड होते.

औरंगाबाद : रुग्ण आजारी असताना अनेकदा काही वैद्यकीय उपकरणांची खरेदी करावी लागते. वैद्यकीय खर्च एवढे महागडे असताना त्यात उपकरणांची खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी खूपच अवघड होते. याशिवाय रुग्ण बरा झाल्यावर ही महागडी उपकरणे घरात पडून राहतात. त्यामुळे सेवानिवृत्त मंडळींनी पुढाकार घेऊन ‘रुग्ण सेवा मंडळ’ची सुरुवात केली आणि आजारी व्यक्तींच्या कुुटुंबियांना एक मदतीचा हात दिला.

एस. के. देशमुख, दिलीप परांजपे, संजय अष्टूरकर, विवेक दिवटे यांच्यासह अजून काही सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी सप्टेंबर २०१८ मध्ये एकत्र येऊन स्वत:च्या पैशातून काही वैद्यकीय उपकरणांची खरेदी केली आणि सिडकोमधील एन- ४ परिसरात रुग्ण सेवा मंडळ सुरू केले. सेमी फाऊलर बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, कुबडी, एअर बेड, वॉटर बेड, नेब्युलायझर, सलाईन स्टँड, साईड स्टँड, वॉकिंग स्टीक यांसारखी उपकरणे सध्या या मंडळात आहेत.

ज्या रुग्णाला यापैकी एखादे पाहिजे असेल, त्यांनी काही रक्कम मंडळात अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून ठेवायची आणि त्यांना हवे असणारे उपकरण पाहिजे तेवढे दिवस विनामूल्य वापरायचे, अशा स्वरूपात या मंडळाचे काम चालते. ज्यांच्याकडे अनामत रक्कम भरण्याइतकेही पैसे नाहीत, अशा रुग्णांची जबाबदारी मंडळातील सदस्यांपैकीच एक जण उचलतात.

७५ रुग्णांना लाभआम्ही पुण्याला अशा प्रकारे काम करणारा ग्रुप पाहिला होता. आपल्याकडे वैद्यकीय उपकरणे भाड्याने मिळतात; पण अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना या उपक रणाचे भाडे भरणेही शक्य नसते. त्यामुळे मग आम्ही औरंगाबाद शहरात या मंडळाची सुरुवात के ली. आज ७५ रुग्ण या उपक रणांचा लाभ घेत आहेत. जर एखाद्या रुग्णाचा फोन आला आणि आमच्याकडे जर त्याने मागितलेले उपकरण उपलब्ध नसेल, तर आम्ही तात्काळ ते आमच्या पैशाने खरेदी करतो आणि रुग्णाकडे पोहोचवतो. ज्यांच्या घरात वापरात नसलेली वैद्यकीय उपकरणे पडून असतील, तर अशी उपकरणेही आम्ही दान स्वरूपात स्वीकारतो. - दिलीप परांजपे

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSocialसामाजिक