शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सोयी सुविधा द्या; मुकुंदनगर-राजनगरच्या नागरिकांचा मनपावर प्रवेशद्वारावर ठिय्या

By मुजीब देवणीकर | Updated: November 15, 2022 18:56 IST

मुकुंदनगर-राजनगर येथील लोकसंख्या बरीच वाढली आहे. महापालिकेने या भागातील वसाहतींना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत.

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे रुळाजवळील मुकुंदनगर- राजनगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. प्रवेशद्वारावर सव्वादोन तास ठिय्या आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

मुकुंदनगर-राजनगर येथील लोकसंख्या बरीच वाढली आहे. महापालिकेने या भागातील वसाहतींना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना बाराही महिने अक्षरश: नरकयातनाच सहन कराव्या लागतात. त्रस्त नागरिकांनी नागरी कृती समितीमार्फत आमखास मैदान ते मनपापर्यंत मोर्चा काढला. गुंठेवारी अंतर्गत मोडणाऱ्या या वॉर्डात मनपाने कोणत्याच सोयी सुविधा दिल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात चिखलात ये-जा करावी लागते. कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत. पथदिवे, ड्रेनेज व्यवस्था नाही. पादचारी महिला नाल्याच्या पाण्यात वाहून गेली, रुळावर अनेक अपघात झाले. काही नागरिकांना जीव गमवावा लागला. रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी वाहन येत नाही. गॅस सिलिंडर घरपोच मिळत नाही. मोर्चात वॉर्डातील महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांना निवेदन दिले.

नागरी कृती समितीच्या प्रमुख मागण्यारेल्वे गेट नंबर ५६ ते बाळापूर फाटापर्यंत सिमेंट रस्ता करण्यात यावा. अंतर्गत रस्ते गुळगुळीत करावेत. भुयारी मार्ग करावा. ड्रेनेजलाईन टाकावी. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सुरू करावी. वाढत्या चोऱ्या व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस चौकी स्थापन करावी. रेल्वे पटरी लगत दक्षिण बाजूला रोड बांधण्यात यावा. पथदिवे लावण्यात यावेत. स्मशानभूमी बांधावी. चुकीच्या पद्धतीने लावलेला कर रद्द करावा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका