शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र

By राम शिनगारे | Updated: August 24, 2023 12:07 IST

बारावीपर्यंतचे शिक्षण शहरात, इस्रोमध्ये गिरवले अभियांत्रिकीचे धडे

छत्रपती संभाजीनगर :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चंद्रयान-३ मोहिमेला प्रचंड यश मिळाले. विक्रम लँडर हे यान चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे लँड करण्यात आले, अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश ठरला. या अभिमानास्पद कामगिरीमध्ये छत्रपती संभाजीनगरातील जेसल दीपक कोटक (रा. गारखेडा) या २५ वर्षीय युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ही शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून चंद्रयान-३ चे १४ जुलै रोजी दुपारी २:३५ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते. या रॉकेटने १ लाख किलोमीटरपर्यंत ठरवून दिलेल्या कक्षेत विक्रम लँडरला यशस्वीपणे पोहोचविल्यानंतर हे रॉकेट समुद्रामध्ये पाडण्यात आले. या रॉकेट प्रक्षेपणाच्या टीममध्ये जेसल कोटक या युवा शास्त्रज्ञाचा समावेश होता. जेसल दोन वर्षांपूर्वीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांना पहिल्या दिवसापासून चंद्रयान-३ च्या मोहिमेवर काम करण्याची संधी मिळाली. चंद्रयान-३ मोहिमेची सुरुवातच रॉकेटमधून विक्रम लँडर पाठविण्यापासून झाली. रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी कामगिरीमुळे हा ऐतिहासिक दिवस भारतीयांना पाहता आला. त्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया जेसल कोटक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

'आयआयटी' सोडून 'आयआयएसटी'त प्रवेशजेसल कोटक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील स्टेपिंग स्टोन हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी स.भु. कनिष्ठ महाविद्यालयातून घेतले. जेसल यांचा नंबर आयआयटीमध्ये लागत होता. मात्र, त्यांना इस्त्रोच्या भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, त्रिवेंद्रम (आयआयएसटी) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. तेथे प्रवेश घेऊन दोन वर्षांपूर्वी त्यांनी ते पूर्ण केले. त्यानंतर ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर, त्रिवेंद्रम येथे शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले व चंद्रयान-३ मोहिमेचा भाग बनले.

मनस्वी अभिमान वाटतोचंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरली. भारतीय शास्त्रज्ञांनी जशी कागदावर योजना तयार केली. जशास तशी योजना प्रत्यक्षात उतरवली. ही अतिशय अभिमानास्पद आणि ऐतिहासिक अशी कामगिरी आहे. या मोहिमेत भाग घेता आला. त्याचा मनस्वी अभिमान वाटतो.-जेसल कोटक, युवा शास्त्रज्ञ, इस्रो

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrayaan-3चंद्रयान-3scienceविज्ञान