शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणे स्वसंरक्षणासाठी २० हजारांत विकत घेतला गावठी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:21 IST

वाहनचालक म्हणून काम करीत असताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत २० हजार रुपयांत आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील एक जणाकडून गावठी पिस्तूल खरेदी केल्याची कबुली जीम ट्रेनरवर पिस्तुलातून गोळी झाडणाºया शहादेव महादेव सोनवणे याने दिली.

ठळक मुद्देपुंडलिकनगर पोलीस : फायरिंग करणाऱ्या आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी, फरार आरोपी सलीमचा शोध सुरू

औरंगाबाद : वाहनचालक म्हणून काम करीत असताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत २० हजार रुपयांत आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील एक जणाकडून गावठी पिस्तूल खरेदी केल्याची कबुली जीम ट्रेनरवर पिस्तुलातून गोळी झाडणाºया शहादेव महादेव सोनवणे याने दिली. जीम ट्रेनरवर गोळी झाडल्याप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.गारखेड्यातील जीम ट्रेनर अलीम शेख यांच्यावर किरकोळ वादातून बुधवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास आरोपी शहादेव सोनवणे याने अन्य आरोपी जितेंद्र वसंत राऊत आणि सलीम याच्या मदतीने गावठी पिस्तुलातून गोळी झाडून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पिस्तूल हाफ लॉक झाल्याने अलीम वाचला होता. याप्रकरणी पोलिसांनी शहादेव आणि जितेंद्रला बुधवारी दुपारीच अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले होते. या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. दरम्यान पोलीस चौकशीदरम्यान शहादेवने पोलिसांना सांगितले की, तो टॅक्सी कारवर वाहनचालक म्हणून काम करतो. रात्री- बेरात्री त्याला प्रवास करावा लागतो. स्वत:च्या आणि प्रवाशांच्या संरक्षणासाठी त्याने आठ महिन्यांपूर्वी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत मध्यप्रदेशातील एक जणाकडून २० हजार रुपयांत हे गावठी पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. आरोपी शहादेव विरोधात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. असे असले तरी त्याने या गावठी पिस्तूलचा यापूर्वी कोठे वापर केला आहे का, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. या पिस्तुलातून यापूर्वी कधी गोळीबार झालेला आहे का, हेदेखील तपासले जाणार आहे. अलीमवर गोळी झाडताना आरोपीसोबत असलेला सलीम हा पसार झालेला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.चौकटआरोपींना रात्री झाली होती मारहाणआरोपी शहादेव आणि त्याच्या मित्रांना जीम ट्रेनर आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथे मारहाण केली होती. या मारहाणीनंतर शहादेव आणि त्याचे साथीदार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. ठाणे अंमलदारांनी त्यांना मेडिकल मेमो देऊन उपचारासाठी घाटी रुग्णालयात जा, उपचार करून आल्यानंतर तुमची तक्रार नोंदवू असे सांगितले. यानंतर त्यांनी घाटीत जाऊन उपचार घेतल्याचे समोर आले.--------------

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी