शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

छत्तीसगडहून आणलेल्या तरुणीला जुंपले वेश्या व्यवसायाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 18:40 IST

एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील विलासपूर येथून आणलेल्या २० वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायाला जुंपल्याचा खळबळजनक प्रकार तिच्याच धाडसाने समोर आला.

ठळक मुद्देपुंडलिकनगरातील एका खोलीत डांबलेल्या या तरुणीने गुरुवारी दुपारी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि तिची आपबिती एका दुकानदाराला सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या घरी जाऊन दलालास चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

औरंगाबाद : एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील विलासपूर येथून आणलेल्या २० वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायाला जुंपल्याचा खळबळजनक प्रकार तिच्याच धाडसाने समोर आला. पुंडलिकनगरातील एका खोलीत डांबलेल्या या तरुणीने गुरुवारी दुपारी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि तिची आपबिती एका दुकानदाराला सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या घरी जाऊन दलालास चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

विकास मन्साराम हिमणे (२०, रा. मुकुंदनगर), असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. आंटी अन्नू ऊर्फ संगीता, अमन आणि दिवाकर मेश्राम यांचा आरोपींमध्ये समावेश असून ते पसार झाले. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विलासपूर येथील बेरोजगार तरुणी स्विटी (नाव बदलले) हिला गावातीलच दिवाकर मेश्राम याने औरंगाबादेतील एका एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. एनजीओमध्ये अधिकारी असलेल्या अन्नू नावाच्या महिलेला त्याने विलासपूर येथे बोलावून घेतले. तेथे अन्नू आणि दिवाकर यांनी पीडितेच्या आईला चांगल्या नोकरीची आणि तिच्या सुरक्षेची हमी दिली आणि १७ फेब्रुवारीला रेल्वेने अन्नूसह ती औरंगाबादेत आली.

पुंडलिकनगरातील गल्ली नंबर २ मध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पीडितेला ठेवण्यात आले. त्या खोलीत विकास आणि अमन हे दोन दलाल राहत. अन्नूने विकास हा तिचा भाऊ, तर अमन हा बहिणीचा मुलगा असल्याचे पीडितेला सांगितले. १७ रोजी रात्री दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. नंतर दुसर्‍या दिवशी ते तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे पांढरा शुभ्र ड्रेस घातलेला आणि हातात व गळ्यात सोन्याचे ब्रासलेट आणि दागिने घातलेल्या एका व्यक्तीसोबत अन्नू मद्य प्राशन करीत होती. त्या व्यक्तीने आणि अन्य एकाने तिला हॉटेलमधील एका खोलीत नेऊन अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला हॉटेलमधून पुन्हा पुंडलिकनगर येथील रूमवर नेऊन बंद करण्यात आले. तेथे आलेल्या एका जणाने स्वत: अन्नूचा पती असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केला. 

साईराज हॉटेलमध्ये सामूहिक अत्याचार१९ रोजी रात्री आरोपींनी तिला साईराज हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलमध्ये दत्ता नावाच्या व्यक्तीने आणि अन्य आठ ते दहा जणांनी पीडितेवर अत्याचार केला. विशेष म्हणजे शेजारच्या खोलीत आंटी अन्नू बसलेली होती. ती ग्राहकांकडून पैसे घेत होती.

पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतरही अत्याचारसलग पाच दिवसांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या अत्याचारामुळे पीडिता आजारी पडली. तिला थंडी वाजून ताप आल्यानंतर तिच्या सोबत राहणार्‍या विकासने तिला मेडिकलवरून एक टॅब्लेट आणून दिली. तिला टॅब्लेट खाऊ घातल्यानंतर आरोपींनी पुन्हा तिला शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे आधीच उपस्थित असलेल्या नराधामांच्या स्वाधीन केले. तेथे सहा ते सात जणांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला त्यांनी पुंडलिकनगर येथील खोलीत आणून डांबले.

...अशी केली तरुणीने स्वत:ची सुटकागुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विकास हा टॉयलेटला गेला होता, तर अमन हा ब्रश करीत होता.  त्यांची नजर चुकवून पीडिता खोलीतून बाहेर पडली आणि गल्ली नंबर ३ मधील एका दुकानदाराकडे गेली. तिने  ‘काका, मला वाचवा’, असे म्हणत टाहो फोडला. ‘ते लोक मला मारून टाकतील, मला मदत करा’, असे ती म्हणू लागली. आरोपीने तिचा मोबाईलही घेतल्याचे सांगितले. काही तरुणांनी या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.ए. सिनगारे यांना कळविली. काही तरुणांनी पीडितेला सोबत घेऊन तिला डांबून ठेवलेल्या रूमवर धाव घेतली. अमन आणि विकासला त्यांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली.  अमन तेथून पसार झाला. मात्र, विकासला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.  

आरोपींनी पीडितेचा मोबाईलही घेतलापीडितेने गावाहून आणलेला सुमारे दहा ते बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपींनी हिसकावून घेतला होता. ते तिला मोबाईल देत नसल्याने तिला आईशी संपर्क साधता आला नव्हता. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात आरोपींविरोधात बलात्कार, अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक सिनगारे हे तपास करीत आहेत.