शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

समृद्धी महामार्गात ‘दलाल’ समृद्ध; जमिनींचे मूल्यांकन संशयास्पदरीत्या होत असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:48 IST

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात ‘दलाल’ समृद्ध होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होतो आहे. जमिनींचे मूल्यांकन संशयास्पदरीत्या होत असून, बांधाचा वांदा निर्माण करून शेतकर्‍यांना राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येत आहे. 

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात ‘दलाल’ समृद्ध होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होतो आहे. जमिनींचे मूल्यांकन संशयास्पदरीत्या होत असून, बांधाचा वांदा निर्माण करून शेतकर्‍यांना राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येत आहे. 

५० टक्के भूसंपादन झाल्याबरोबर महामार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांची जमीन दरांच्या वादामुळे संपादित होणार नाही, त्यांचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. त्या भीतीने ग्रासलेल्या ४४ शेतकर्‍यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी एन.के. राम यांची भेट घेऊन ७२ एकर जमिनींच्या दरांबाबत विचारविनिमय करण्याची विनंती केली. या ४४ शेतकर्‍यांच्या जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव मिळत असून, त्यांच्या जमिनीलगत ५० लाखांहून अधिकचा एकरी भाव मिळतो आहे. जमिनीचा पोत, पीक, सुपीकता सारखीच असताना फक्त बांध आणि शीघ्रगणक दर व विक्री व्यवहारांच्या दस्तांआधारे शेतकर्‍यांचे असे नुकसान होत आहे, असे मत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना मांडले. एमएसआरडीसी महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार भूसंपादनासाठी रक्कम अदा करीत आहे. जमिनींचे मूल्यांकन करताना उत्पन्न, विद्यमान पीक, विहिरी व त्यातील बोअर, शीघ्रगणक दर, खरेदी-व्रिकी व्यवहाराचे दस्तऐवज याचा विचार केला जात आहे. जमिनीचे पोटखराब दाखविण्यासाठी मागील दहा वर्षांतील पिकांचा विचार होतोय काय, कारण २०१२ पासून जिल्हा दुष्काळाचा सामना करतो आहे. मग बागायत आणि जिरायत, पोटखराब हे विश्लेषण महसूल प्रशासन कसे करीत आहे. याबाबत शेतकरी प्रश्न विचारीत आहेत. दलालांचे याप्रकरणात भूसंपादन यंत्रणेशी लागेबांधे असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

शेतकर्‍यांनी दिला आत्मदहनाचा इशाराफतियाबाद येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. फतियाबादमधील जमिनीला १२ लाख एकरी तर दौलताबादला ९२ लाख एकरी दर दिला जात आहे. दोन फुटांच्या अंतरातील हा अन्याय शेतकर्‍यांना रस्त्यावर आणू पाहत आहे. समान दर जाहीर करावेत, अन्यथा सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे बाळू हेकडे, कचरूसिंग जारवाल, बिजूसिंग जारवाल, चत्तरसिंग सुंदर्डे, बाळासाहेब भगत, मारोती फटांगडे, चंद्रभान ढेपके, राजू हेकडे आदी शेतकर्‍यांनी केली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी