शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव आरटीओकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:34 IST

दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव

ठळक मुद्दे२०० जणांवर होणार कारवाई  वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे पडले महागात

औरंगाबाद : वारंवार आवाहन करूनही वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या आणि मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणाऱ्या वाहनचालकांचा वाहन परवाना (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने आरटीओ कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती समोर आली.  

याविषयी शहर वाहतूक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाहतूक नियम न पाळल्याने रस्ता अपघात होतो, हे सर्वमान्य आहे. असे असताना अनेक वाहनचालक नियम न पाळता सुसाट वाहन पळविताना आढळतात. विशेषत: मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणे आणि वाहतूक सिग्नल तोडून सुसाट जाणे सर्वाधिक धोकादायक आहे. ही बाब लक्षात घेऊन मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका, सिग्नल तोडून जाऊ नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने अनेकदा वर्तमानपत्रांतून केले जाते. एवढेच नव्हे तर चौकाचौकांत  वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारीही वाहनचालकांचे समुपदेशन करीत असतात.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गतवर्षी तब्बल ९७ हजार  नागरिकांना वाहतूक नियम मोडून वाहन चालविताना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून सव्वातीन कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. असे असले तरी दंडात्मक कारवाईचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या आदेशाने शहर वाहतूक विभागातर्फे  पहिल्या टप्प्यात मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या आणि सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यास सुरुवात केली.

या अंतर्गत डिसेंबरपासून कालपर्यंत २१० वाहनचालकांना  मोबाईलवर बोलत दुचाकी चालविताना आणि सिग्नल तोडून जाताना पोलिसांनी पकडून त्यांचे लायसन्स जप्त केले. या वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पोलिसांतर्फे संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एच.एस. भापकर यांनी दिली. 

आरटीओंना पोस्टाद्वारे पाठविले प्रस्तावपोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या काही वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स हे बाहेरील जिल्ह्यांतील असतात. ज्या जिल्ह्याच्या आरटीओंनी लायसन्स दिले, त्याच आरटीओ कार्यालयाकडे कारवाईसाठी लायसन्स पाठवावे लागते. ही बाब लक्षात घेऊन बाहेरील जिल्ह्यांतील आरटीओंना स्पीड पोस्टाने लायसन्स आणि प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस