शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रचाराची रणधुमाळी थांबली; फोडाफोडी, पाठिंब्याच्या राजकारणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 2:24 PM

सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाºया भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता गुफ्तगू आणि फोडाफोडीच्या राजकारणासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी दिवसभर धावपळ सुरू असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी ५ वा. संपला. शेवटच्या दिवशी पूर्ण शक्तिप्रदर्शनाने सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी, एमआयएम, अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौरंगी लढतीमुळे मैदान कोण मारणार, हे अस्पष्ट आहे. कडक उन्हाळ्यात निवडणुका असल्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार करताना घाम निघाला. २८ मार्चपासून उमेदवार अर्ज भरण्याची मुदत होती. 

८ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर लोकसभा मैदानाचे चित्र स्पष्ट झाले. २३ उमेदवार मैदानात राहिले. पदयात्रा, रिक्षा, सभा, कॉर्नर बैठका घेऊन मागील पंधरा दिवस पूर्ण मतदारसंघात रणधुमाळी सुरू राहिली. जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’तून वाहन रॅली, प्रचार सभांसह प्रचार वाहनांना परवानगी दिली. अंदाजे ३०० हून अधिक रिक्षा, चारचाकी प्रचारात होत्या. रविवारी सायंकाळी ५ वा. प्रचार तोफा थंडावल्यानंतर सर्व पक्ष-अपक्ष उमेदवारांनी प्रचार वाहनांचा आढावा घेत त्यावरील भोंगे, स्पीकर्स, बॅनर्स, झेंडे काढून घेतले की नाहीत, याचा आढावा घेतला. 

स्टार प्रचारकांच्या सभांचा बोलबालाया वेळच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचाराकांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आ. टी. राजासिंग, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. नितीन बानगुडे यांच्या सभा झाल्या. कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आदींच्या सभा झाल्या. जालना लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गडकरी आदींच्या सभा झाल्या. एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. असदोद्दीन ओवेसी, भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. काही अपक्ष उमेदवारांनी स्वत:च सभा घेऊन प्रमुख पक्षातील उमेदवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019