शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीणमधील १६ हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 19:19 IST

राज्य पोलीस दलात फौजदार पदावर सरळसेवा भरती प्रक्रियेने ५० टक्के पदे भरली जातात, २५ टक्के पदे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीद्वारे भरली जातात.

ठळक मुद्दे२०१३ साली पोलीस हवालदारांना फौजदारपदी बढती देण्यासाठी विभागीय परीक्षा घेतली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या पोलिसांना वेगवेगळ्या कारणाने पदोन्नती देण्यात आली नव्हती. यामुळे काही पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

औरंगाबाद: २०१३ साली फौजदारपदाची विभागीय परीक्षा देणाऱ्या १०८० हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला. यात औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीण पोलीस दलातील १६ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.

राज्य पोलीस दलात फौजदार पदावर सरळसेवा भरती प्रक्रियेने ५० टक्के पदे भरली जातात, २५ टक्के पदे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीद्वारे भरली जातात. २०१३ साली पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस हवालदारांना फौजदारपदी बढती देण्यासाठी विभागीय परीक्षा घेतली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या पोलिसांना वेगवेगळ्या कारणाने पदोन्नती देण्यात आली नव्हती. यामुळे काही पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाने १२ मे रोजी राज्यातील १०८० हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. निवडसूचीसह हा निर्णय पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक यांना पाठविला. 

औरंगाबाद शहरातील पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे-संजीवकुमार सोनवणे, सुधाकर पाटील, रईसउद्दीन शेख, रमेश नरवडे, आबासाहेब गाडेकर, महेमूद पठाण, कल्याण चाबुकस्वार, निसारउद्दीन शेख, दीपक ढोणे, संजय काळे, अण्णासाहेब शेजवळ, राजेंद्र खंडागळे, सुभाष चव्हाण, कौतिक गोरे, रावसाहेब जोंधळे, हनीफ सय्यद, एकनाथ वारेे, रावसाहेब वाघ, अनवर अहेमद शेख, संजीव बहिरव, गोवर्धन चव्हाण, तातेराव लोंढे, विश्वास महाजन, दिलीप जाधव, मच्छिंद्र ससाने, लक्ष्मण वाघ, दगडू तडवी, काकासाहेब जगदाळे, मिलिंद पठारे, हेमंत सुपेकर, समियोद्दीन सिद्दिकी.

औरंगाबाद ग्रामीणमधील बढती झालेले हवालदारसतीश बोदले, रावसाहेब बोराडे, मोहम्मद आश्रफ पठाण, बबन धनवट, दिलीप चौरे, देविदास खांडखुले, कल्याण राठोड, सीताराम महेर, मधुकर मोरे, जनार्दन मुरमे, उत्तम आवटे, बाळू कानडे, शिवनाथ आव्हाळे, काशिनाथ लुटे, सुधाकर पाडळे, जयराम ढवळे, विलास चव्हाण, प्रकाश जाधव.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद