शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 19:46 IST

विद्यार्थिनीकडे आता २५ हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी २५ हजार रुपये दे, आहे संभाषण असलेली ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे ५० हजारांची लाच मागण्यात आल्याची एक ऑडीओ क्लिप बुधवारी समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

डॉ. उज्वला भडंगे यांनी शिक्षणशास्त्र विषयामध्ये संशोधन करत असलेल्या विद्यार्थिनीकडे आता २५ हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी २५ हजार रुपये असे ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची ऑडीओ क्लिप बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाली. विद्यार्थिनीने याप्रकरणी कुलगुरू आणि पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर आज दुपारी विद्यापीठातील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत डॉ. भडंगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. उज्वला भडंगे यांचे विभाग प्रमुख पद काढून घेऊन निलंबित केले आहे. तसेच प्रकरणाची एक समिती चौकशी करेल. समितीने दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू येवले यांनी दिली आहे. 

असे आहे व्हायरल ऑडीओ क्लिपमधील संभाषण पहिले संभाषण...विद्यार्थिनी - मॅडम, वहिनी सांगत होत्या तुमचा फोन आला होता.प्राध्यापिका - हो, तुम्ही या लवकर.विद्यार्थिनी - २५ हजार एकदम नाही जमणार, २५ हजार दोघींचे आहेत का?प्राध्यापिका - नाही, दोघींचे स्वतंत्र,विद्यार्थिनी - ही फी आहे का? पैसे काढायला भावाला सांगावे लागेल. कशाचे आहेत ते?प्राध्यापिका - सगळं फोनवर नाही बोलता येणार, व्हाॅटस् ॲप काॅल कर..............दुसरे संभाषण...प्राध्यापिका - अंजली, सरांचा (गाईड) मला काॅल आला होता. तुम्ही त्यांच्याशी बोललात म्हणे.विद्यार्थिनी - हो मॅम.प्राध्यापिका - तुम्ही तिकडे गेलात, मला सांगितले नाही तुम्ही?विद्यार्थिनी - नाही, मॅम. तुम्ही म्हटले तुम्हाला खूप प्रेशर आले. म्हणून मी त्यांना भेटण्यासंदर्भात बोलले.प्राध्यापिका - सर मला म्हणाले, तुम्ही विद्यार्थिनींना थेट का म्हटले.विद्यार्थिनी - मॅम हे चुकीचे आहे. त्यांनी तुम्हाला यात ओढायला नको होते.प्राध्यापिका - बेटा या लाईनमध्ये असे होते. सर मला म्हणाले, आता बघा मी काय करतो. मी त्यांना म्हटले, असं काही करू नका. तुम्ही माझ्याबद्दलही त्या सरांजवळ चुकीचे बोलल्याचे ते म्हणाले.विद्यार्थिनी - नाही मॅम, काहीच नाही. उगाच ते तुम्हाला म्हणत आहेत. मी फक्त सरांना म्हटले, तुम्हाला बोलायचे आहे. तुम्हाला काॅलेजला भेटायला येते उद्या. एवढेच बोलले.प्राध्यापिका - सर, मला म्हटले रात्री घरी येतो. तुम्ही त्यांना सांगा, आणून द्या.विद्यार्थिनी - किती वाजता येतील मॅम सर?प्राध्यापिका - ते त्यांच्या सोयीने येतात. आठ साडेआठ वाजता येतील. सर विचारत होते, मॅडम हा माझ्या तुमच्यातील विषय आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत जात तर नाही ना?विद्यार्थिनी - सर सर्वच विद्यार्थ्यांसोबत असे करतात का ?प्राध्यापिका - हो, अरे मी गेले आहे ना त्यांच्याकडे व्हायवा घ्यायला. मला माहिती आहे ना. ते काय करतात. म्हणून मी तुम्हाला पूर्ण सांगितले नाही. कारण ते तुमचे गाईड आहेत. एवढंच म्हटलं, बाई देऊन टाका त्यांना व्हायवाच्या वेळी वाटल्यास मी त्यांना विनंती करेल. तर तू ऐकायला तयार नाही. कालपासून मला अडवून ठेवलंस, झुलवत ठेवलं म्हटलं तरी चालेल.विद्यार्थिनी - मॅडम आम्हाला तेच चांगले वाटले नाही. तुम्हाला का त्रास आमच्यामुळे. म्हटलं थेट डील करावी.प्राध्यापिका - पण, सर मला यात समाविष्ट करत आहे. कारण ते दुसऱ्यांवर भरवसा ठेवत नाहीत. मी तुम्हाला सांगत आहे. किंतु परंतु न करता त्यांना तुम्ही पैसे द्या. माझ्यावर तरी विश्वास ठेवा तुम्ही.विद्यार्थिनी - ते जर सारखेच पैसे मागत राहिले तर...प्राध्यापिका - असा कसा मागेल सारखा पैसे? मी त्यांचा नरडा नाही पकडणार का? शेवटी व्हायवाच्या वेळी तो तुम्हाला म्हणेल.विद्यार्थिनी - त्यावेळी आम्हाला किती पैसे द्यावे लागेल?प्राध्यापिका - हीच रक्कम असेल.विद्यार्थिनी - २५ हजार रुपये?प्राध्यापिका - हो, एखाद्या वेळेस मी त्यांना विनंतीही करेल, की घेऊ नका म्हणून पैसे. मी तुझी वाट बारा वाजेपासून बघते आहे. तू बोलल्याचे मला वाईट वाटले.विद्यार्थिनी - साडेचार वाजता येऊ का?प्राध्यापिका - पाच वाजता या. तुझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवते. तू मला पाच वाजता इथे पैशांसोबत पाहिजे. माझे पतीचे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्याचा मी कान पकडून त्याला झापू शकते. अन् तू मला एकदम म्हटली की मी काही देऊ शकत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र