शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक त्रस्त; महारेराकडे महापालिकेकडून शहरातील फक्त आठ बांधकाम प्रस्ताव दाखल!

By मुजीब देवणीकर | Updated: August 12, 2023 19:14 IST

शहरातील अनेक भव्यदिव्य प्रकल्प रखडलेलेच

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पाचशे चौरस मीटरपेक्षा अधिक जागेवरील एखाद्या गृह प्रकल्पाला मंजुरी दिली तर त्याची एक प्रत त्याच दिवशी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणकडे (महारेरा) पाठविणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, मागील दोन महिन्यांत महापालिकेकडून फक्त ८ प्रकल्पांची माहिती देण्यात आली. उर्वरित किमान ४० पेक्षा अधिक प्रकल्पांची माहिती महारेराला देण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. मात्र, महापालिकेने या आरोपांचे खंडन केले.

शहरात एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्यात आली. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला चांगली गती मिळाली. शहरात ठिकठिकाणी मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. प्रत्येक गृहप्रकल्पासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घ्यावीच लागते. एका मोठ्या बांधकाम परवानगीतून महापालिकेला किमान दोन कोटींहून अधिक रक्कम मिळते. बांधकाम व्यावसायिक ऑनलाइन पद्धतीने बीपीएमएस या प्रणातील अर्ज करतात. नगररचना विभाग अनेक दिवस व्यावसायिकांना उंबरठे झिजवायला लावते. त्यानंतर कशीबशी बांधकाम परवानगी मिळते. बांधकाम व्यावसायिकांचे श्रम येथे थांबत नाहीत, तर बांधकाम परवानगीची माहिती मनपानेच महारेराला पाठविणे बंधनकारक आहे. मागील काही दिवसांपासून ही माहिती महारेराला उपलब्धच करून दिली जात नसल्याचा आरोप काही बांधकाम व्यावसायिकांनी केला. कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या व्यावसायिकांना नगररचना विभागात अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर प्रतीक्षेत आरोपीसारखे उभे राहावे लागते, अशी खंतही काहींनी व्यक्त केली.

महारेराला प्रस्ताव दिलेदरम्यान, संचालक मनोज गर्जे यांनी सांगितले की, बीपीएमएस प्रणालीतून आपोआप ही माहिती महारेराला जाणे अपेक्षित आहे. शासनाच्या प्रणातील सुधारणा केली नाही. आम्ही मनपाच्या नावाचा वेगळा ई-मेल आयडी तयार केला. ८ प्रस्ताव महारेराला पाठविण्यात आले आहेत. दीड महिन्यात आणखी किती मोठ्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिली याची माहिती महारेराला पाठविण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेचे सहकार्य मिळतेमहारेराकडे राज्यभरातील प्रस्ताव येतात. या प्रस्तावात काही बोगस बांधकाम परवानग्या असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महापालिकांनी थेट परवानगी महारेराला द्यावी, असा नियम करण्यात आला. प्रत्येक शहरासाठी वेगळा डेस्क महारेराने तयार केला. महापालिकेकडून सहकार्य मिळत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.- रोहित सूर्यवंशी, सचिव, क्रेडाई

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका