शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:21 IST

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता कायम : कापूस, मका, सोयाबीनच्या पिकांवर होणार परिणाम; पुढील महिन्यात आणेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.जिल्ह्यात आजवर ५० टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादन घटणार आहे. पावसाच्या तुलनेत पैठण, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद तालुके ५० टक्क्यांच्या आतच आहेत. ६७५ मि.मी. जिल्ह्याची पावसाची सरासरी असून, आजवर ३३८ मि.मी. पाऊस झाला आहे. ४६६ मि.मी. इतका पाऊस होणे अपेक्षित होते. ११७ मि.मी. इतका पावसाचा खंड आहे. त्यामुळे मुबलक पावसाअभावी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांचे साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे. सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यांत पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु आॅगस्टमधील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशी...जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात मक ा, कापूस पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकांचे उत्पादन घटणे शक्य आहे. गंगापूर तालुक्यात पिकांची परिस्थिती बिकट आहे. सिल्लोड तालुक्यातील या हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार आहे.कन्नड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यांत फारशी चांगली परिस्थिती नाही. काही ठिकाणी मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना व इतर जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे. तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र