शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पैठण कारागृहात कैदी करणार नैसर्गिक गुळनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:15 IST

कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या हायजेनिक गु-हाळाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक  राजेंद्र धामणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

पैठण ( औरंगाबाद) : येथील खुल्या कारागृहात आता कैदी हायजेनिक गुळाची निर्मिती करणार आहेत. शुक्रवारी ५ लाख ३० हजार रुपये खर्चून कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या हायजेनिक गु-हाळाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक  राजेंद्र धामणे यांच्या हस्ते करण्यात आले. येथे नैसर्गिक पद्धतीने गुळाची निर्मिती करण्यात येणार असून, निर्माण झालेला गूळ राज्यभरातील कारागृहात पाठविला जाणार आहे. 

गु-हाळाच्या शुभारंभप्रसंगी खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन साळवे, पैठण न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश ए. जे. कराड, नाशिक कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, एस. एन. ठेणगे, मानवतकर, बाळासाहेब जाधव, बिभिषण तुतारे, तुरुंगाधिकारी एन. एम. भानवसे, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. नागदरवाड, किशोर बोंडे, पोलीस निरीक्षक चंदन ईमले, सुदाम वारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहाकडे जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जवळपास ३०० एकर जमीन आहे. या जमिनीत कैद्यांचे मनुष्यबळ वापरून शेती केली जाते. विविध भाजीपाला व उसाची लागवड या जमिनीत केली जाते. येथे गु-हाळ सुरू करण्यासाठी कारागृह अधीक्षक साळवे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मान्यता मिळाल्यानंतर येथे ५ लाख ३० हजार रुपये खर्च करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.   कोल्हापूर पद्धतीची गु-हाळ यंत्रणा कारागृहात उभी करण्यात आली आहे.

सर्व कारागृहांना जाणार गुळ येथे उत्पादित शेकडो टन गूळ महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहांना पुरविला जाणार आहे. या गु-हाळ यंत्रणेची रोजची क्षमता २५ टन असली तरी सुरुवातीला  ६ ते ७ टन उसाचे गाळप करून हळूहळू गाळपक्षमता वाढविण्यात येणार आहे.

६५ एकर क्षेत्रात ऊस लागवड कारागृह प्रशासनाच्या ताब्यातील शेतात सध्या ३५ एकर ऊस उभा असून, जवळपास ६५ एकर क्षेत्रात ऊस लागवड सुरू आहे. गु-हाळाबाबतची तांत्रिक माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन वेळेस कोल्हापूर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.  

टॅग्स :jailतुरुंगAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद