शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराच्या हाताला झटका देऊन कैद्याचे हातकडीसह घाटी रुग्णालयातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 12:34 IST

crime news in Aurangabad : एका आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून त्याने जेलमधील दुसऱ्या आरोपीस कपडे घेऊन बोलावले असल्याचे सांगितले.

औरंगाबाद : धारदार शस्त्राने वार करून लूटमार करणे, तसेच पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात आरोपीने सहायक फौजदाराच्या हाताला झटका देऊन धूम ठोकल्याची घटना सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयात घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

शेख शकील शेख आरेफ (२५, रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव) असे पळून गेलेल्या न्यायाधिन कैद्याचे नाव आहे. शेख शकील याने २०१७ मध्ये साथीदारांसह छावणी परिसरात आणि पंचवटी चौकालगत चाकूने वार करून लूटमार केली होती. या प्रकरणात छावणी ठाण्यात दोन गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठी पडेगाव परिसरात गेले होते, तेव्हा त्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. याविषयी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. 

आरोपी शकील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. मानेजवळ आलेल्या गाठीवर उपचार करण्यासाठी सोमवारी त्याला पोलीस बंदोबस्तात घाटी रुग्णालयात आणले होते. सहायक फौजदार ए. एस. पवार आणि महिला हवालदार उज्ज्वला राठोड त्याच्यासोबत होत्या. आरोपी शकील यास हातकडी घालून आणि दोरखंड हातात पकडून पवार हे त्याला वॉर्डात घेऊन गेले. डॉक्टर आहेत का, हे पाहण्यासाठी राठोड आतमध्ये गेल्या. यावेळी गॅलरीत उभ्या असलेल्या शकीलने पवार यांची नजर चुकवून हातकडीचा दोर सोडला आणि त्यांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह धूम ठोकली. सहायक फौजदार पवार, राठोड यांनी त्याचा घाटी परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

पोलीस नियंत्रण कक्षाला फोनया घटनेनंतर सहायक फौजदार पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून आरोपी शकील पळून गेल्याचे कळविले. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, गुन्हे शाखेचे स.पो.नि. जारवाल यांनी घाटीत धाव घेतली आणि शकीलचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

दुसऱ्या आरोपीच्या भावाला केला कॉलआरोपी शकीलसोबत घाटीत अनेक आरोपी आले होते. एका आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून त्याने जेलमधील दुसऱ्या आरोपीस कपडे घेऊन बोलावले असल्याचे सांगितले. त्या आरोपीचा भाऊ कपडे घेऊन घाटीत येईपर्यंत शकीलने धूम ठोकली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद