शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हित आणि नियमानुसार कामास प्राधान्य; नवनियुक्त प्रकुलगुरू तेजनकर यांनी स्पष्ट केली भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:18 IST

पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेजनकर यांनी सर्वांशी संवाद साधला. विद्यार्थी हिताला सर्वांधिक प्राधान्य देणार असून, प्रत्येक काम नियमानुसार केले जाईल. विद्यापीठ कायदाचा भंग करून कोणतेही काम केले जाणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्रकुलगुरूपदी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. अशोक तेजनकर यांची शुक्रवारी नियुक्ती केली. या पदाचा पदभार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते डॉ. तेजनकर यांनी घेतला.

औरंगाबाद : आपल्या पगारासाठी शासन पैसा देते. हा पैसा जनतेचा असतो. यामुळे प्राध्यापक, कर्मचार्‍यांनी या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी नियमानुसार, कायद्यानुसार काम करणे अपेक्षित आहे. नियमानुसार काम करणारांच्या पाठिशी खंबिरपणे उभे राहिल. मात्र कपाळकरंटे काम करणार्‍यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल,असा इशारा नवनियुक्त प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी पदभार स्विकारतेवेळी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्रकुलगुरूपदी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. अशोक तेजनकर यांची शुक्रवारी नियुक्ती केली. या पदाचा पदभार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते डॉ. तेजनकर यांनी घेतला. पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम महात्मा फुले सभागृहात पार पडला. यावेळी विद्यापीठ, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिसभा सदस्य, प्राचार्य, अधिष्ठातांनी मनोगत व्यक्त केले. 

पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेजनकर यांनी सर्वांशी संवाद साधला. विद्यार्थी हिताला सर्वांधिक प्राधान्य देणार असून, प्रत्येक काम नियमानुसार केले जाईल. विद्यापीठ कायदाचा भंग करून कोणतेही काम केले जाणार नाही. कर्मचारी, अधिका-यांनीही नियमानुसार काम केल्यास कोणतीही संघटना, नेता दबाव आणू शकत नाही. जर दबाव आणलाच तर त्याला विरोध करण्याचे धैर्य माझ्याकडे आहे. तरीही सर्व गट-तट बाजूला ठेवून महामानवाचे नाव असलेल्या विद्यापीठाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य सर्वांना सोबत करणार असल्याचेही डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी केला. यावेळी मंचावर कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी,  परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता  डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके, डॉ. मजहर फारूकी, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वाल्मिक सरवदे यांनी केले. आभार डॉ. नंदकुमार राठी यांनी व्यक्त केले.

...आता तरी प्रभारी राज संपवाविद्यापीठाचा मागील तीन-चार वर्षांपासून कारभार हा प्रभारींवर केला जात आहे.  डॉ. अशोक तेजनकर यांच्या रूपाने प्रकुलगुरू पूर्णवेळ मिळाला आहे. आता तरी किमान हे प्रभारी संपवून विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या, अशी सुचना अधिसभा सदस्य प्रा. सुनिल मगरे यांनी यावेळी केली. तसेच डॉ. गजानन सानप, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. विक्रम खिलारे, डॉ.संजय साळुंके,डॉ. मजहर फारुकी, प्राचार्य उत्तम पांचाळ, डॉ. शंकर अंभोरे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त करत नवनियुक्त प्रकुलगुरूंना कामकाजात सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद