शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

अभियानापेक्षा शेतकºयांचे सोयाबीनला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:38 IST

मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही.

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही. आता १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्यासाठी’ अधिकारी कर्मचारी गावात जात आहेत. मात्र सगळेच सोयाबीन काढणीस जात असल्याने गावात कुणीच भेटत नसल्याने तसेच परतण्याची वेळ आली आहे.यापूर्वी ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानात प्रत्येक गावाच्या विकासाचे आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यातून सध्यातरी काही निष्पन्न झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यानंतर हागणदारीमुक्तीचा नारा आला. त्यात काम सुरू होते न होते तोच ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले. शेतीत काम नसल्याने लोकांनी त्यालाही चांगला प्रतिसाद दिला. ‘मिशन अंत्योदय’ यातून प्रत्येक गावातील गरिबी करण्यात येईल, असे सांगितले जाते. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचेही बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहेत. कोणतेही अभियान आले की, दुष्काळाच्या काळात खिशालाच चाट लावून जात असल्यामुळे गावात अधिकाºयांची गाडी आली की, ग्रामस्थ थेट त्यांना कट मारत आहेत. आता १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाºयांना चक्क ग्रामस्थांचा शोध घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. या अभियानात पंधरा दिवसात कारावयाचे नियोजन तंतोतंत पद्धतीने केलेले आहे.मात्र अभियानात सोयाबीन काढणीमुळे ग्रामस्थच भेटत नसल्याने कर्मचारी ग्रामस्थांना विनवणी करण्यातच हैराण आहेत. यामध्ये १ आॅक्टोबर रोजी गावात पंधरवडाविषयक जाणीव जागृती, तर २ आॅक्टोबर रोजी प्रभातफेरी व ग्रामसभा, मिशन अंत्योदयअंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींच्या योजनेबाबत सविस्तर माहिती देणे, तसेच ३ ते ५ आॅक्टोबरदरम्यान, गावात स्वच्छता व आरोग्यविषयक जाणीव जागृती करणे, ६ ते ९ आॅक्टोबरमध्ये कृषी सभा घेऊन कृषीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. तर १० आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत विकास आराखड्यात गावास माहिती देणे, ११ आॅक्टोबर रोजी मनरेगा, स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व जलसंधारण बाबत कृती आराखडा, १२ आॅक्टोबर रोजी पीएमईजी लाभार्थ्यांची यादी वाचून दाखविणे व घरकुलांच्या कामासाठी सुरुवात, तर १३ व १४ आॅक्टोबर रोजी कौशल्य विकासाबाबत विविध योजनांची युवकांना माहिती देणे आणि शेवटी १५ आॅक्टोबर रोजी पंधरवड्यात केलेल्या कामाची व नियोजनाची माहिती गावकºयांना देणे व शासनास अहवाल देणे असे अतिशय सूक्ष्म नियोजन केले खरे; मात्र हा संपूर्ण कार्यक्रमच सोयाबीन कालावधीत असल्याने फार भयंकर परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे अभियान लोकसहभागातून असल्याने यासाठी लोकांचा सहभाग महवाचा असतो. मात्र सोयाबीन काढणीमुळे ते शक्य होत नसल्याचे समोर येत आहे. तसेच समारोपाचा फोटो कसा घ्या, हेही नियोजन केलेले आहे.