शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

प्राचार्यांनी परीक्षेवरून काढले विद्यापीठ प्रशासनाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:43 IST

या परीक्षेत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १५ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्यांची बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. प्राचार्य आणि त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विद्यापीठ प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. या परीक्षेत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक नाट्यगृहात बुधवारी (दि.३) बोलावली होती. या बैठकीला प्राचार्य किंवा त्यांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर अध्यक्षस्थानी होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय सोळुंके, डॉ. संजीवनी मुळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हरिदास विधाते, डॉ. दिगंबर नेटके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीत डॉ. तेजनकर यांनी परीक्षेच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करीत महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले; मात्र प्राचार्यांनी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारची चिरफाड केली.

वसंतराव नाईकचे प्राचार्यांचे प्रतिनिधी डॉ. विक्रम खिलारे म्हणाले, परीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी ३ रुपये देण्यात येतात. हा निधी अतिशय तोकडा आहे. झेरॉक्सपासून शाई, गम, स्टेपलर आदी खर्च मोठ्या प्रमाणात आहे. हा खर्च प्राध्यापक, प्राचार्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो. तासिका तत्त्वावरचे प्राध्यापक, पूर्णवेळ प्राध्यापकांनी परीक्षेच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही. हा सगळा खर्च विद्यापीठाने दिला पाहिजे. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून विद्यापीठाकडे काही कोटी रुपये जमा होतात. त्या तुलनेत विद्यापीठ परीक्षेसाठी किती खर्च करते? याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणीही डॉ. खिलारे यांनी केली.

‘नॉनसेन्स’ प्रशासनमागील दोन वर्षांपासून परीक्षा घेतल्याचा मोबदला महाविद्यालयाला दिलेला नाही. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. परीक्षेत प्राचार्यांना स्थानिक प्रमुख बनविण्यात येते. हे बदलले पाहिजे. प्राचार्य त्यांच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करू शकतात. त्यांना ती मुभा दिली पाहिजे. त्यास इतर प्राचार्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला; मात्र हे प्रशासन नॉनसेन्स असल्यामुळे काहीच करीत नसल्याचा त्रागाही एम. पी.लॉचे प्र्राचार्य डॉ.  सी. एम. राव यांनी व्यक्त केला. या शब्दावर अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आक्षेप घेतला तेव्हा डॉ. राव यांनी शब्द मागे घेत त्या शब्दाबद्दल माफीही मागितली; मात्र प्रशासन सुधारण्याचे साकडे यावेळी घातले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाcollegeमहाविद्यालय