शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

By admin | Updated: August 18, 2014 00:31 IST

हिंगोली : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिंगोली : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.हिंगोली जिल्ह्यातील लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ओंकार प्रिंटर्सच्या मंजुषा घवाड यांना प्रथम पुरस्कार १५ हजार तर राधीका स्टील इंडस्ट्रीजचे श्यामसुंदर मुंदडा यांना १० हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार मिळाला. शिक्षण विभाग- पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाबद्दल प्रणिता पारसकर आणि साक्षी पारसकर यांना गौरविण्यात आले. समाज कल्याण विभाग- छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार योजनेंतर्गत आशा खंदारे हिला १० हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालय- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार राकेश भट्ट यांना प्रथम पुरस्कारात ५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी भट्ट यांनी पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना देण्याची घोषणा केली. ग्रामीण विकास विभाग- यशवंतराव पंचायत राज अभियान विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्काराने पं.स. सभापती छगनराव बनसोडे, उपसभापती विनोद नाईक व गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांना गौरविण्यात आले. आरोग्य विभाग- संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रवृत्त करणाऱ्यांत प्रथम रंजना सरोदे, द्वितीय मुक्ता खुडे आणि तृतीय सुजाता धुळधुळे यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाने गौरविण्यात आले. उपकेंद्र स्तरावर- के.जी. सोनुने, एस.डी. सुरोशे आणि आय.आर. बांगर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. आरोग्य केंद्र - आखाडा बाळापूर, सिरसम बु. आणि कुरूंदा केंद्राने अनुक्रंमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी बाजी मारली. ग्रामीण केंद्रांमध्ये औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाने बाजी मारली. सूत्रसंचालन प्रा.मदन मार्डीकर यांनी केले. (प्रतिनिधी)