औचित्य होते, भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० या व्हर्च्युल सोहळ्याचे. औरंगाबाद शाख मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन आणि मिशन झिरो हे प्रकल्प राबवित आहे. १२८ दिवसांत ७४ हजार अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या. या चाचण्यांतून ४ हजार ६०० कोरोना सकारात्मक रुग्ण शोधले. त्याशिवाय स्मार्ट हेल्मेटद्वारे ५०हजार २०० लोकांच्या चाचण्या करून त्यातून १९५ कोरोना रुग्ण शोधून दिले. संघटनेच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या कार्याबद्दल जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांचा आऊटस्टँडींग कॉन्ट्रीब्यूशन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ३५ वर्षाच्या निरंतर सेवेकरिता गौतम संचेती यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेकरिता पारस चोरडिया, प्रकाश कोचेटा, अमित काला, प्रविण पारख, अनिल संचेती, राहुल झांबड आणि अभिजीत हिरप आदी परिश्रम घेत आहे.
भारतीय जैन संघटनेच्या स्थानिक शाखेचा गौरव
By | Updated: November 29, 2020 04:05 IST