शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात येणारी जड वाहने रोखण्यासाठी पोलिसांचे ‘संरक्षक कडे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:28 IST

‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाई

औरंगाबाद : ‘नो एन्ट्रीत घुसखोरी सुरूच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी   प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचा-यांची दुस-या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नो एन्ट्रीमध्ये एकही जड वाहन आणि खाजगी बस शहरात  प्रवेश करणार  नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशित केले. यानंतर वाहतूक शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरच जड वाहने रोखण्यासाठी ‘संरक्षक कडे’ उभारल्याचे समोर आले. 

याविषयी मिळालेली माहिती अशी की, गत सप्ताहात शहरात तीन वाहन अपघातात चार जणांचे बळी गेले. यात दोन अपघात जड वाहनांमुळे, तर तिसरा अपघात खाजगी बसमुळे झाला होता. जड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ डिसेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाहतूक विभागातील अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. याविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आता सर्व प्रकारची जड वाहने दिवसभर आम्ही शहराबाहेर ठेवणार आहोत. सध्या जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश दिला जातो. आता या वाहनांना प्रवेश न देण्याविषयी प्रशासन विचार करीत आहे. 

आता प्रवेशद्वारावर अडविणार जड वाहनेशहराच्या प्रवेशदारातच जड वाहने अडविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, अशी माहिती सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक एच.व्ही. गिरमे यांनी दिली. ते म्हणाले की, बीड बायपास रोडवरील देवळाई चौकातून शिवाजीनगरमार्गे शहरात येणारी वाहने देवळाई चौकात तर झाल्टा फाटा, सावंगी वळण रस्ता आणि जालन्याकडून येणारी वाहने केम्ब्रिज शाळा चौक, शिवाय चिकलठाणा येथील जुन्या वळण रस्त्यावरही वाहने रोखण्यात येत आहेत. वाहनांचा शहरातील प्रवेश रोखण्यासाठी केम्ब्रिज चौकात दोन, देवळाई चौकात तीन, हर्सूल टी-पॉइंट येथे दोन आणि चिकलठाणा जुना वळण रस्ता येथे एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नियुक्त असेल. वाहतूक पोलिसांसोबत संबंंधित ठाण्याच्या कर्मचाºयांची मदत घेण्यात आली आहे.

तीन दिवसांत ४२ जड वाहनांवर कारवाईनियम तोडून शहरात आलेल्या ४२ जड वाहने आणि खाजगी बसेसवर प्रत्येकी बाराशे रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी दिली. या वाहनचालकांकडून ६१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.