शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी दबावतंत्राचे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 20:26 IST

तिन्ही मतदारसंघांतील मतांच्या गोळाबेरजेवर चिंतन

ठळक मुद्देप्रशासनाची सावध भूमिका

औरंगाबाद : लोकसभेतील निवडणुकीत तिन्ही मतदारसंघांतील मतांची गोळाबेरीज केल्यानंतर शिवसेना, भाजप युतीचे विधानसभा इच्छुक झपाट्याने नवीन मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत; परंतु मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक १ जानेवारी असल्यामुळे आता मध्येच नव्याने अर्ज स्वीकारण्यात जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शविली असून, राजकीय दबाव आणून मतदार नोंदणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

काही तुरळक अपवादामध्ये मतदार नोंदणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या नवमतदारांचे अर्ज नाकारण्यात आले त्या मतदारांच्या कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून त्यांची नावे विधानसभा यादीत समाविष्ट होऊ शकतात. यामध्ये स्थलांतरित, नवविवाहित, मागील काही वर्षांपासून नोंदणी न होणे याबाबतचे पुरावे तपासून प्रशासन नोंदणीचा निर्णय घेणार आहे. जिल्हाभरातून जास्तीत जास्त १५ ते २० हजारांपर्यंत मतदार नोंदणी वरील अनुषंगाने होणे शक्य आहे; परंतु एकाच मतदारसंघातून १० ते २० हजार मतदारांची संख्या नव्याने नोंदवून घेणे, हे मात्र शक्य नाही. तसे झाल्यास आयोगाकडून थेट चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी जी अर्हता तारीख होती, त्या तारखेपर्यंत हे अर्ज का आले नाहीत, याची विचारणा आयोग जिल्हा प्रशासनाला करू शकते. नवीन मतदारांच्या अर्जांची पडताळणीदेखील होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले, तसेच आजवर १९ हजार नवमतदार अतिरिक्त होतील. ३० जुलैपर्यंत आॅनलाईन आलेले अर्ज घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार होणे शक्य नाही. असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादVotingमतदान