शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सध्या मी मराठवाड्याचा प्रशासकीय नेता- पुरुषोत्तम भापकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:58 IST

हल्ली चांगले प्रशासकीय नेते कमी आहेत आणि म्हणून मी आपल्या पदाचा अधिकाधिक उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करीत असतो’ असे मत विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले. 

औरंगाबाद : ‘म्हटले तर माझे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहेत. म्हटले तर कोणत्याच राजकीय पक्षांशी नाहीत. पुढे काय होईल सांगता येणार नाही. पण सध्या तरी मी मराठवाड्याचा प्रशासकीय नेता आहे. हल्ली चांगले प्रशासकीय नेते कमी आहेत आणि म्हणून मी आपल्या पदाचा अधिकाधिक उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करीत असतो’ असे मत विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले. 

ते हास्यदिनानिमित्त डी. एस. काटे व हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे यांनी घेतलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होते. मसापमध्ये झालेल्या या मुलाखतीच्या वेळी रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती.ते म्हणाले की, महापालिकेत ११५ नगरसेवक असतात. पण आयुक्त एकच असतो. आज मी विभागीय आयुक्त आहे. पण मराठवाड्यात खासदार-आमदार अनेक आहेत. मला कुणी गॉड फादर नाही. मनाला, बुद्धीला जे पटते ती माझी विचारधारा राहिली. मला जो अधिकार मिळाला, त्याचा वापर जनतेसाठी करीत आलो. प्रशासनात उत्तम नेतृत्व देण्याचं काम मी केलंय. कारण प्रशासकीय नेतृत्वही फार महत्त्वाचं आहे. 

 डॉ.भापकर यांची मुलगी नुकतीच आयएएस झाली. त्या अनुषंगाने श्रोत्यांमधूनच प्रश्न विचारला गेला. त्यावर भापकर म्हणाले, मी सतत माझ्या मुलांना फ्री हँड देत गेलो. तुमच्या आवडीचं जे जे तुम्हाला करावं वाटतं, ते करा, पण त्यासाठी कठोर परिश्रम घ्या, अशी माझी भूमिका राहत आली.  डिसेंबरमध्ये यात्रेत आलेले अनेक तमाशे मी पाहिले. तमाशांमध्ये प्रगल्भता असते. वाईट काहीही नसते. जयश्री काळे- नगरकर या तमाशा कलावंताचा मुलगा नुकताच आयएएस झाला. यापेक्षा मोठा आनंद तो काय असू शकतो.  अमृत हास्य क्लबने शेवटी हास्याचे प्रयोग करून दाखवल्यानंतर कार्यक्रम संपला.

 प्रेयसी भेटली होती का?महाविद्यालयीन जीवनात कुणी एखादी प्रेयसी भेटली होती का? या थेट प्रश्नावर डॉ. भापकर उत्तरले, प्रेयसी रोजच भेटत असते. पण ती बºयाच जणांना शोधता येत नाही. मी तर रोजच शोधण्याचा प्रयत्न करतो. राधेसारखं प्रेम प्रत्येकात असतं आणि प्रेमाच्या जोरावर कुणी कुठंही जाऊ शकतं. कोणत्या प्रेमाची ताकद तुम्ही निर्माण करू शकता हा प्रश्न आहे. प्रेम आईचं, बायकोचं, मैत्रिणीचं, मुला- मुलींचं कुणाचंही असू शकतं. (टाळ्या)

टॅग्स :Dr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकरcommissionerआयुक्तMarathwadaमराठवाडा