शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहानंतरही दुसऱ्या लग्नाची तयारी उघड; संतापलेल्या तरुणाने विवाहितेचा केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 14:05 IST

प्रेमविवाह असताना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

औरंगाबाद : प्रेमविवाह लपवून कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या प्रयत्नांत असलेल्या नवरदेवाने बिंग फोडणाऱ्या विवाहितेचाच विनयभंग केला. तिने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले की, विशाल कैलास चव्हाण कोठेकर (रा. कोठा, ता. मंठा, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. तहसील कार्यालयातील लिपिक पती व मुलासह तक्रारदार महिला पडेगाव भागात राहते. तिच्या शाळकरी मैत्रिणीचा प्रेमविवाह दूरचा नातेवाईक विशाल सोबत लपून झाला होता. तरीही विशालने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे समजल्यावर विशालच्या पत्नीने मैत्रिणीला फोन करून त्याला दुसरे लग्न करू देऊ नका, अशी गळ घातली. त्यानुसार विवाहितेने विशालच्या नातेवाइकांना पहिल्या लग्नाची माहिती दिली. हे प्रकरण समजल्याने त्याचे दुसरे लग्न मोडले. 

पडेगावातील विवाहिताच याला जबाबदार असल्याचा गैरसमज करून घेत त्याने २५ सप्टेंबरला तिचे घर गाठून शिवीगाळ केली. त्यानंतरही तो विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवरून शिवीगाळ करीत होता. त्याने गुरुवारी (दि. २) दुपारी पडेगावात येऊन तिचा विनयभंग केला. गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्रही हिसकावून घेतले. कोणाला काही सांगितल्यास पती व मुलास जिवे मारण्याची धमकी विशालने दिल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद