शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 20:08 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सिल्लोड (औरंगाबाद) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड येथील नागरी सत्काराची आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्यावतीने जैय्यत तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे  केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुन खोतकर व  प्रा.सुरेश नवले यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  रविवारी  विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण निमित्ताने सिल्लोड येथे येत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड शहरांतील प्रत्येक चौकात स्वागताचे बॅनर, होर्डिंग, कमानी, भगव्या पताका लावण्यात आल्या आहे.

नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात होणार सभामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12 वाजता सिल्लोड शहरात आगमन होणार आहे. शहरातील औरंगाबाद नाका ते सभास्थळापर्यंत मुख्यमंत्र्यांचे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यादरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकाचे लोकार्पण, तालुक्यातील ६६५ कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड योजनेचे भूमिपूजन, नॅशनल सुतगीरणी उभारणी कामाचे भूमिपूजन,सिल्लोड नगर परिषद प्रशासकीय इमारत तसेच नगर परिषद प्रशाला बांधकामांचे भूमिपूजन , नॅशनल मेडिकल कॉलेज चे भूमिपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर नगर परिषद प्रशाला येथे आयोजित भव्य सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील.--------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे