शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:10 IST

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.

ठळक मुद्देइकापोल पुलपीपट : बुद्धिस्ट सेंटर, बँकॉक विमानसेवेसाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) उद्योजकांशी इकापोल पुलपीपट यांनी शनिवारी (दि.२१) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआय’चे अध्यक्ष राम भोगले, नितीन गुप्ता, कमलेश धूत, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे (एमएसीसीआयए) सुहास दाशरथी, प्रसाद कोकीळ, टुरिझम प्रमोटर्स गील्डचे अध्यक्ष जसवंतसिंग, ‘मसिआ’चे अभय हंचनाळ, मनीष गुप्ता, अजय शहा, सुनील रायठ्ठा, केशव पारटकर, तनसुख झांबड आदी उपस्थित होते.राम भोगले, सुहास दाशरथी यांनी प्रारंभी थायलंड सरकारकडून अपेक्षित असलेल्या बाबी नमूद केल्या. औरंगाबाद ही उद्योग आणि पर्यटननगरी आहे. देश-विदेशांत विविध मालाची निर्यात केली जाते. मराठवाड्यातही उद्योगवाढीसाठी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.थायलंडमध्ये बौद्ध धर्म रुजलेला आहे. वेरूळ, अजिंठा लेणीला थायलंडचे पर्यटक भेट देतात. त्यामुळे भारत, श्रीलंका आणि थायलंड या बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनक्षेत्रात मोठ्या संधी आहेत. बँकॉकहून थेट औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत; परंतु थायलंडहून येणाºया विमानात किमान ८० टक्के प्रवासी हवेत, अशी अट भारत सरकारने घातली आहे. ही अट दूर केल्यास बँकॉक- औरंगाबादला थेट विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल,असे ते म्हणाले.श्रीलंकेतून औरंगाबादला थेट विमानसेवा सुरू करायची असल्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. याच धर्तीवर थायलंडहून औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याचे भोगले यांनी इकापोल पुलपीपट यांच्या निदर्शनास आणून दिले.औरंगाबाद जिल्ह्यात थायलंड सरकार, थायी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून थायी विहार, बुद्धिस्ट सेंटर उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातून पर्यटनवाढीस आणखी चालना मिळेल,असे ते म्हणाले.

टॅग्स :Buddha Cavesबौद्ध लेणीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन