शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

शहर स्वच्छतेला देणार प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:14 IST

नांदेड: शहर स्वच्छ व सुंदर करण्याला आपली प्राथमिकता राहणार प्रतिपादन महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी केले़

शहर स्वच्छतेला देणार प्राधान्यलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहर स्वच्छ व सुंदर करण्याला आपली प्राथमिकता राहणार असून त्यानंतर प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी केले़ आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती़ ते म्हणाले, गेल्या २१ वर्षाच्या शासकीय सेवेत अनेक चढ-उतार पाहिले़ परंतु कायद्याला सर्वोच्च मानत आजपर्यंत कोणत्याही मुद्यावर तडजोड केली नाही़ गेल्या दोन दिवसात मनपा कारभाराची माहिती घेतल्यानंतर देशमुख म्हणाले, शहरातील स्वच्छतेच्या विषयावर लक्ष देण्याची गरज आहे़ त्यानंतर इतर विकास कामे करण्यावर भर राहिल़ स्वच्छतेचे काम करणाऱ्या एटूझेडला हटविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते़ ती करण्यात आली नाही़ परंतु लवकरच निविदा काढून शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्यात येणार आहे़ पावसाळापूर्व नालेसफाईसाठी चारही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून लवकरच शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे़ नांदेड शहराला सोलार सिटी बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ त्याअंतर्गत एलईडी स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहेत़ तसेच शहर बस वाहतुक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे़ शहरातील प्रवाशांसाठी ही सेवा सुरु करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील़ शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आले आहेत़ अशाप्रकारे बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात येणार आहे़ याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे़ असेही आयुक्त देशमुख म्हणाले़