परभणी : घरगुती वापराचे २५ हजार रुपये किंमतीचे निळ्या रंगाचे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना नानलपेठ पोलिसांनी ३० मार्च रोजी रात्री ९.३० च्या सुमारास शहरातील शिवाजी चौक भागात पकडले आहे. घरगुती वापराचे निळ्या रंगाचे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती नानलपेठ पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने शिवाजी चौक भागात तपासणी केली असता (एम. एच. १४ - एफ. ८९३३) क्रमाकांच्या लोडींग आॅटोमध्ये ५ हजार २५० रुपये किंमतीचे निळे रॉकेल आढळून आले. या प्रकरणी आॅटोसह मुद्देमाल असा २५ हजार २५० रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. डी. रेड्डी यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला .
परभणीत रॉकेल जप्त
By admin | Updated: April 1, 2016 01:01 IST