शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महात्मा बसवेश्वरांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:50 IST

औरंगाबाद : जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मंगळवारी (दि.७) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर चौकात (आकाशवाणी) ...

ठळक मुद्देशोभायात्रा : दुचाकी रॅलीने वेधले लक्ष, महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद : जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मंगळवारी (दि.७) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर चौकात (आकाशवाणी) सकाळी ध्वजवंदन केल्यानंतर वाहन रॅली काढण्यात आली, तर सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हर हर महादेव,’ अशा जयघोषांनी शहर दुमदुमून गेले.महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समिती आणि शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे सकाळी महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे अंबादास दानवे, समितीचे अध्यक्ष अमोल हुंडीवाले, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रभाकर पटणे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमास नगरसेवक सचिन खैरे, उद्योजक बसवराज मंगरुळे, भरत लकडे, देवीदासअप्पा उंचे, शिवा खांडखुळे, विलासअप्पा सांभाहरे, गणेश कोठाळे, शिवानंद मोधे, नितीन माठे, राहुल गवंडर, प्रतीक मेने, मनोज गवंडर, आशिष लकडे, शेखर कोठुळे, सागर कळसने, अमोल मिटकरी, ओंकार स्वामी, गणेश कोठाळे, परशुराम मोधे, दीपक उरगुंडे आदींची उपस्थिती होती.युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभागध्वजारोहणानंतर समितीतर्फे वाहन रॅली काढण्यात आली. चारचाकी वाहनातील महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य प्रतिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवक- युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गजानन महाराज मंदिर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, बळीराम पाटील चौक, एम-२ मार्गे टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर रॅलीचा समारोप झाला.शिवा संघटनेतर्फे अभिवादन,मोटारसायकल रॅलीशिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे सकाळी ९ वाजता आकाशवाणीयेथे अभिवादन सोहळा घेऊन ध्वजवंदन करण्यात आले. प्रा. मनोहर धोंडे अध्यक्षस्थानी होते. सोमेश्वरअप्पा हळीघोंगडे, रामेश्वरअप्पा लांडगे, वीरभद्र वनशेट्टी, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, चंद्रकांत सुतार, शिवदास तोडकर, उमेश दारूवाले, तुकाराम सराफ, अनिता चिकाळे आदींची उपस्थिती होती. यानंतर शिवा संघटनेतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. मोंढा नाका, क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे टीव्ही सेंटर येथे रॅलीचा समारोप झाला.एकसमान वागणुकीची शिकवण -पालकमंत्रीयावेळी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी समाजात परिवर्तन घडविले. अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करून परिवर्तनवादाची, समाजप्रबोधनाची अणि सगळ्यांना एकसमान वागणुकीची शिकवण दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक