शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप जैस्वाल अटकेत; जेलमध्ये रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:38 IST

दंगलीप्रकरणी अटक केलेल्या गांधीनगर येथील दोन आरोपींना जामिनावर सोडावे, यासाठी शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांशी हुज्जत घातली आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांना शिवीगाळ करून टेबलावरील काच फोडून खुर्च्यांची मोडतोड केली.

ठळक मुद्देवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ : आरोपीला सोडण्यासाठी क्रांतीचौक ठाण्यात हुज्जत, टेबलवरील फोडली काच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगलीप्रकरणी अटक केलेल्या गांधीनगर येथील दोन आरोपींना जामिनावर सोडावे, यासाठी शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांशी हुज्जत घातली आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांना शिवीगाळ करून टेबलावरील काच फोडून खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी जैस्वालविरोधात गुन्हा नोंदविला. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारत त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.याविषयी प्राप्त माहिती अशी की, ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. याविषयी माहिती मिळताच रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मा.आ. प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसलेले होते. यावेळी ते गांधीनगर येथील आरोपींना जामिनावर सोडा, असे म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोहेकॉ. पोटे यांनी सांगितले. सपोनि. शेख हे लगेच ठाण्यात आले आणि त्यांनी जैस्वाल यांना सांगितले की, गांधीनगर येथूनच दंगलीला सुरुवात झाली आहे, या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. काही वेळानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली. यावेळी त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आणि सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते त्यांना घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोहेकॉ. पोटे यांनी जैस्वालविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला.क्रांतीचौक ठाण्यातील सीसीटीव्ही बंदक्रांतीचौक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेºयांचे नियंत्रण पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आहे. मात्र ठाण्यातील काही कॅमेरे बंद आहेत तर काही सुरू आहेत. रविवारी रात्री पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराच्या कक्षात माजी आमदार जैस्वाल यांनी ठाणेदाराशी हुज्जत घालून तेथील टेबलवरील काच फोडल्याची घटना घडली. कॅमेरा बंद असल्याने ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नाही.नवीन काच दिली आणून..जैैस्वाल यांनी पोलीस ठाण्यातील काच फोडल्याचे कळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लगेच धावपळ करून दुसरी काच ठाणेदारांना आणून दिली.