शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

औरंगाबादच्या प्रदीप जगदाळेच्या स्फोटक खेळीने मुंबईचा ग्लास पॉलिश इंडिया संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:42 AM

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळे याच्या स्फोटक खेळीच्या ...

ठळक मुद्दे स्पर्धेतील मानकरी सामनावीर - प्रदीप जगदाळे गोलंदाज - अक्षय दरेकर फलंदाज - रोहित राणे मालिकावीर : मानसिंग निगडे

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळे याच्या स्फोटक खेळीच्या बळावर मुंबईच्या ग्लास पॉलिश इंडिया संघाने सहारा मुंबई संघावर दणदणीत विजय मिळविताना अजिंक्यपद पटकावले.अझर अन्सारी याच्या ३२ चेंडूंतील ५ चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ५५ धावांच्या बळावर सहारा मुंबईने २० षटकांत ८ बाद १३८ धावा फटकावल्या. त्याच्याशिवाय राहुल देसाईने १९ धावा केल्या. ग्लास पॉलिश इंडियातर्फे सुशांत खैरे याने १४ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात औरंगाबादचा डावखुरा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळेच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ग्लास पॉलिश इंडिया संघाने विजयी लक्ष्य १७.३ षटकांत ६ गडी गमावून १३९ धावा करून पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रदीप जगदाळे याने तब्बल ८ षटकार व ६ चौकारांसह ६२ चेंडूंतच नाबाद ९६ धावांची वादळी खेळी केली. कर्णधार रोहित राणे १३ धावांवर बाद झाला. सहारा मुंबईकडून मानसिंग निगडे, अक्षय दरेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.प्रदीप जगदाळेने रणजीपटू समद फल्ला, अझर अन्सारी, भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व करणाºया अक्षय दरेकर यांचा विशेष समाचार घेतला. समद फल्लाह याला नेत्रदीपक पूल आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारणाºया प्रदीप जगदाळे याने अक्षय दरेकर व अझर अन्सारी यांना प्रत्येकी ३ टोलेजंग षटकार ठोकले.अंतिम सामन्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जया गुदगे, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, आशुतोष डंख, गोंडे पाटील, हिरा सलामपुरे, आनंद तांदुळवाडीकर व अ‍ॅड.मयूर यादव उपस्थित होते.