शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:09 IST

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावे, तर जालना जिल्ह्यातील उर्वरित ६५ गावांचा समावेश असून सध्या ही गावे आपले दैनंदिन व्यवहार अंधारातच पार पाडत आहेत.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एक मार्चपासून थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली. शहरात ६० हजार ग्राहकांकडे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या २० दिवसांच्या कालावधीत अवघी १४ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. शहरामधील थकबाकीदार ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यामुळे तब्बल २४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद  आणि जालना जिल्ह्यांमध्ये १ लाख ९७ हजार ५८९ ग्राहकांकडे  जवळपास १४४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद शहरात विभाग क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये ६० हजार ४९८ वीजग्राहकांकडे ७५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवतोडून परिश्रम घेत असून, थकबाकीदार ग्राहकांकडून १४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली होत नसल्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. १ मार्चपासून २४ हजार ३१४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात, तर ३७३ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी १३ लाख रुपये थकबाकी आहे.

ही गावे आहेत अंधारातकन्नड विभागांतर्गत अंबाला, भडली, खर्डी या तीन गावांचा संपूर्ण वीजपुरवठा कापण्यात आला आहे. याशिवाय जालना विभाग क्रमांक एकमध्ये काजळा, नांदापूर, वरखेडा, बेठलम, इंदलकरवाडी, धार, धावेडी, बोरगाव, बीबी, निरखेडा या दहा गावांचा आणि जालना विभाग क्रमांक दोनमध्ये शेरगोडा, अंगलगाव, डोलारा, पांडे पोखरी, सुरमगाव, हातडी, परवाडी, वडारवाडी, वाळखेड, घाणेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, विरेगाव, कोटला, गुंज, घोसी, बंगालेवाडी, मुधेगावा, चपडगाव, मानेपुरी, बोरगाव तांडा, भायगव्हाण, मंगरूळ, अंभोडा खुर्द, वीरगव्हाण, मुरूमखेडा, तालटोंडी, ठेगेवदगव्हाण, पांगरी वायाळ, वाधेगाव, वाघोडा, वाघला, सहद वडगाव, वरूड, वझर सरकटे, वाधोना, खडकी, जयपूर, भांबेरी, दोडगव्हाण, सौंदलगाव, डोमेगाव, रेणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, जालोरा, करंजळा, कुरण, डोमलगाव, चर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादJalanaजालना