शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर मार्गावर खड्डेच खड्डे;वाहतूक कोंडीने उद्याेगांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:35 IST

डागडुजी करणे गरजेचे : १०० कि.मी. अंतरातील मार्गावर खड्डेच खड्डे

छत्रपती संभाजीनगर : येथून पुण्याकडे जाणाऱ्या विद्यमान चौपदरी मार्गावर सद्यस्थितीत प्रचंड खड्डे झाले आहेत. तसेच पुणे ते अहिल्यानगरपर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी नेहमीची झाली असल्यामुळे त्याचा फटका उद्योगांना बसतो आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगामी काळात उद्योग येणार आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस वे चे काम पूर्ण होईपर्यंत विद्यमान मार्गावरच येथील उद्योग व इतर सामान्य वाहतुकीला अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग मजबूत करण्यासह वाहतुकीच्या कोडींतून मुक्त केल्यास उद्योगांना चालना मिळेल, असे मत शुक्रवारी ऑरिक सिटी येथे शेंद्रा-बिडकीन उद्योग वसाहतीतील अडचणींबाबत संवाद बैठकीत उद्योजकांनी मांडले.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह डीएमआयसी सहव्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, व्यवस्थापक महेश पाटील, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, निलम बाफना आदींची उपस्थिती होती. यावेळी मासिआ व इतर उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींनी अडचणी मांडल्या.

१०० कि.मी. अंतरातील मार्गावर खड्डेछत्रपती संभाजीनगर ते पुणे या विद्यमान मार्गावर जिल्ह्याच्या हद्दीतील अनेक भागात खड्डे आहेत. तसेच पुढे अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत हा रोड प्रचंड खराब झालेला आहे. विशेषत: नगर शहरात व दौंड चौफुलीपर्यंतचा रस्ता पूर्ण खराब व वाहतूक कोंडीचा झालेला आहे. पुण्यापर्यंत वाहतूक खोळंबलेली असते.

वाहतूक काेंडीतून दिलासा देण्यासाठी सूचनाछत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्यावरील वाहतूक सुलभ व्हावी, यादृष्टीने नियोजन करावे, तसेच वाहतुकीसाठी सुरळीत होण्यासाठी उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयीन स्तरावर याबाबत पत्रव्यवहार केला जाईल. नवीन एक्सप्रेस-वे चे अलायन्मेंट सुरू झाले आहे. त्याचा आढावा शुक्रवारी घेतला.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त

दोन दिवसीय शिबिर घेणारशेंद्रा-बिडकीन येथील उद्योजकांच्या प्रशासकीय प्रलंबित विषयांबाबत दोन दिवसीय शिबिर घेत त्या सोडविण्यात येतील. जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासोबतच उद्योग वाढीसाठी प्रशासन उद्योजकांसोबत आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर