लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे आणि अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांच्या सकारात्मक अश्वासनानंतर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्यात आले. चुकीने केलेले निलंबन रद्द करण्यासाठी बिलोलीचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. नरवाडे यांनी आणि चुकीची नियुक्ती रद्द करुन योग्य नियुक्ती मिळविण्यासाठी भोकर विभागातील शेख फारुख शेख खाजा या दोघांनी ८ जूनपासून विद्युतभवनसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.त्यांच्या उपोषणास माविकसंने ९ जून रोजी द्वारसभा व १० जून रोजी असहकार आंदोलन जाहीर केले होते. मात्र याबाबत महावितरणने दखल घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.माविकसंचे प्रकाश वागरे, एस.बी.बुक्तरे, भीमराव सोनकांबळे, आदींची उपस्थिती होती.
माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित
By admin | Updated: June 11, 2017 00:29 IST