शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

पदव्युत्तरच्या मुदतपूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:00 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळी दोन महिने उशीर केल्याचा वेळ भरून काढण्यासाठी चक्क दोन महिन्यांच्या शिकवणीनंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ९० दिवस तासिका न होताच २६ मार्चपासून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देप्रवेश गोंधळाचा परिणाम : परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वेळी दोन महिने उशीर केल्याचा वेळ भरून काढण्यासाठी चक्क दोन महिन्यांच्या शिकवणीनंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ९० दिवस तासिका न होताच २६ मार्चपासून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले.विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी घेतलेल्या सीईटीमुळे प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला होता. या प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिने उशीर झाल्यामुळे १ सप्टेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात झाली. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा डिसेंबरअखेर घ्याव्या लागल्या. तत्पूर्वी परीक्षा विभागाने तृतीय सत्रांच्या परीक्षा घेतल्या होत्या; मात्र द्वितीय सत्राला १ जानेवारीपासून सुरुवात झाली. यामुळे तेव्हापासून ९० दिवसांची शिकवणी पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट होते. मे महिन्यात पदव्युत्तरच्या परीक्षा घेतल्यास त्याचा परिणाम आगामी शैक्षणिक वर्षावर होणार असल्यामुळे परीक्षा विभागाने या परीक्षा मार्च महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २६ मार्चपासून पदव्युत्तरच्या परीक्षा सुरू होणार आहेत; मात्र या परीक्षेत ९० दिवसांच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप करीत परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिले आहे. या निवेदनावर भाग्यश्री धापसे, मंदाकिनी मोकळे, कोमल मोकळे, मीनाक्षी वसापे, शेख हिना शेख सिकंदर, प्रांजली गवई, ज्योती कीर्तिशाही, प्रियंका मोरे, विद्यार्थी दाभाडे, सुनीता आठवले, शरद निकाळजे, ज्योती पगारे, प्रियंका पवार, सुनीता कांबळे, पल्लवी पाटील आदींसह ६० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.लघु शोधप्रबंध सादर करण्यास वेळ द्याविद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एम.एस. डब्ल्यू, एमबीए, एमएडसारख्या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक असते. यात लघुशोध प्रबंध, क्षेत्रकार्य आदींचा समावेश आहे. हे काम करण्यास पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. यामुळे मुदतीपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.