शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोविडनंतरचे पर्यटन; मराठवाडा कृषी व ग्रामीण पर्यटन महामंडळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 19:04 IST

औरंगाबाद- नांदेड- तुळजापूर हा मार्ग ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाने बहरलेला असून हा मार्ग म्हणजे मराठवाड्याचा सुवर्ण त्रिकोन होऊ शकतो.

ठळक मुद्दे सोयगाव आदिवासी भूमी पर्यटन. यात्रांचे नियोजन व स्थानिक पर्यटन

औरंगाबाद : ‘कोविड १९ मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील अनुभवजन्य पर्यटनाचा प्रचार करून  पर्यटकांसाठी टूर्स चालू करता यावे, या अनुषंगाने पर्यटन संचालनालयातर्फे दि. २० ऑक्टोबर रोजी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्याचे प्रतिनिधित्व आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक यांनी केले असून  मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मराठवाडा  कृषी व ग्रामीण पर्यटन महामंडळाची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली. 

मुंबई येथे झालेल्या या बैठकीला पर्यटन विभागाचे सहसंचालक धनंजय सावळकर व सहायक योगेश निर्गुडे यांची विशेष उपस्थिती होती. पर्यटन वृद्धीसाठी काय करता येईल, यासाठी महाराष्ट्रातून १२ पर्यटनतज्ज्ञांना बैठकीदरम्यान सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्यातून गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अनिरुद्ध नाईक यांनी मराठवाड्यातील पर्यटनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. सादरीकरणात अजिंठा-गौताळा टूरिझम कॉरिडॉर हा मुद्दा नाईक यांनी मांडला. यामध्ये हेमाडपंथी मंदिरे, धबधबे, किल्ले ही माहिती ऐकून संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या मार्गाचे काम लवकरच पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच बुलडाणा येथील जाईचा देव ते पाटणादेवी या भागातील निसर्ग अतिशय समृद्ध असून या क्षेत्राचा विकास  झाल्यास मराठवाड्यात आलेला पर्यटक ४ ते ५ दिवस मराठवाड्यातच मुक्काम करेल, यातूनच स्थानिकांना रोजगार मिळेल, असे मतही नाईक यांनी मांडले.

मराठवाड्याचा गोल्डन ट्रँगल- औरंगाबाद- नांदेड- तुळजापूर हा मार्ग ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाने बहरलेला असून हा मार्ग म्हणजे मराठवाड्याचा सुवर्ण त्रिकोन होऊ शकतो.- अजिंठा पर्यटन प्राधिकरणाची गरज- कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन- अजिंठा महोत्सवाची गरज- यात्रांचे नियोजन व स्थानिक पर्यटन- धार्मिक, कृषी व ग्रामीण पर्यटन यांचा परस्पर विकास- सोयगाव आदिवासी भूमी पर्यटन. असे मुद्देही नाईक यांनी पर्यटनाच्या दृष्टीने मांडले.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद