बीड : तालुक्यातील कर्र्झनी फाट्यावर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. सोमवारी दुपारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली.रोहित उर्फ बंटी हनुमान बहिरवाळ (रा. मांडवजाळी ता. बीड) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन प्रभारी अधीक्षक वैभव कलुबर्मे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना गणेश दुधाळ, जयसिंग वाघ, मुंजाबा सौंदरमल, बबन राठोड, श्रीमंत उबाळे यांनी सापळा लावला. कर्र्झनी फाट्यावर रोहित बहिरवाळला पकडले. पिस्तूलमध्ये काडतूसे नव्हती. बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याच्याविरुद्ध पोना दुधाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. (प्रतिनिधी)
गावठी पिस्तूलसह एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 23:32 IST