लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात रात्री उमटले. काही ठिकाणी समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत वाहनांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अकरा संशयितांना ताब्यात घेतले आहे.प्रशांतीनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर तालुका ठाण्यात आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने गर्दी केली होती. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद शहरातील काही भागांत उमटले. काही समाजकंटकांनी बुधवारी रात्री उशिरा घोषणाबाजी करत औरंगाबाद चौफुली, बसस्थानक, गांधीचमन, इंद्रानगर, नूतनवसाहत परिसरात वाहनांवर दगडफेक करत मालमत्तेचे सुमारे दोन लाखांचे नुकसान केले. या प्रकारामुळे त्या त्या भागांत भितीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी संपूर्ण फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी संशयित अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस अधीक्षक पोकळे यांनी गुरुवारी शांतता समितीची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले.
तोडफोड करणारे अकराजण ताब्यात
By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST