बाजारसावंगी : इंदापूर ते झरी फाटा या रस्त्याच्या दुरुस्ती वा नविकरणाचे काम निकृष्टपणे केले जात असून या कामाची चौकशी करुन ठेकेदारासह शाखा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदापूर येथील नागरिकांची झरी मार्गावर शेती असून पावसाळ्यात या शेतकऱ्यांना शेतात तसेच झरी, वडगांव या गावांना जाण्यासाठी चिखलातून ये-जा करावी लागते. गावकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळाला. ठेकेदाराकडून सदर काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी नागरिकांनी पंचायत समितीचे शाखा अभियंता डी. बनसोडे, सभापती गणेश अधाने, जि.प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असून निकृष्ट काम थांबवून अंदाजपत्रकानुसार काम करण्याची मागणी केली आहे. मात्र कामात कोणताही बदल झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. शाखाअभियंता बनसोड यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्यानी याबाबतीत बोलण्याचे टाळले. त्यामुळे सदर शाखा अभियंता व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी इंदापूर येथील नागरिकांनी केली आहे.
फोटो : इंदापूर ते झरी रोडचे कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर केला जात आहे.
050221\sayyad lal sayyad chand_img-20210203-wa0006_1.jpg
इंदापूर ते झरी रोडचे कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर केला जात आहे.